Babanrao Shinde: अजितदादांच्या आमदाराला पैसे देण्यासाठी मराठा समाजाने धरली झोळी; दिलगिरी व्यक्त केल्यानंतरही..

Babanrao Shinde on Manoj Jarange : "जो लोकप्रतिनिधी मराठा आरक्षण विरोधी भूमिका घेतील त्यांना समाज धडा शिकवेल,"
Babanrao Shinde News
Babanrao Shinde News Sarkarnama
Published on
Updated on

Pandharpur: मनोज जरांगेंबाबत ‘तुम्ही एकट्यानेच समाजाचा ठेका घेतलाय का’ असे विधान करणं राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराला चांगलचं महागात पडलं आहे. दिलगिरी व्यक्त केल्यानंतरही त्यांच्याविरोधात मराठा समाज आक्रमक झाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माढ्याचे आमदार बबन शिंदे यांनी जरांगेंबाबत केलेल्या विधानाबाबत मराठा समाजाने निषेध व्यक्त केला आहे. आमदार बबन शिंदे यांनी जरांगे पाटील यांच्या पंढरपुरात झालेल्या सभेचा खर्च केल्याचं वक्तव्य केले होते. जरांगे यांनी एकट्याने समाजाचा ठेका घेतला आहे का" असे वक्तव्यही त्यांनी केले होते. या वक्तव्याचा निषेध म्हणून मराठा समाजाच्या महिला झोळी धरून निधी‌ जमा करीत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Babanrao Shinde News
Maratha Reservation: मराठा आरक्षण का टिकलं नाही? शंभूराज देसाईंना नक्की म्हणायचं काय...

रणजीत शिंदे यांच्या फोन पे वर सुद्धा 1 ते 5 रुपये

आज (रविवारी) इसबावी येथील आंदोलनात आमदार शिंदे यांचे पैसे देण्यासाठी महिलांनी झोळी धरली. समाजातील बांधवांनी 1 रुपया ते 5 रुपयांचे दान टाकून आमदार शिंदे यांचे पैसे देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. त्यांचे पुत्र रणजीत शिंदे यांच्या फोन पे नंबरवर सुद्धा 1 ते 5 रुपये पाठवून त्यांचा निषेध करण्यात आला. "जो लोकप्रतिनिधी मराठा आरक्षण विरोधी भूमिका घेतील त्यांना समाज धडा शिकवेल," असा इशारा मराठा समाजाने दिला आहे.

जरांगे पाटलांच्या आंदोलनाबाबत बोललो नाही..

विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या मोळी पूजनाच्या कार्यक्रमात ‘तुम्ही एकट्यानेच समाजाचा ठेका घेतलाय का’ एवढेच आमदार बबनराव शिंदे यांचे विधान समाज माध्यमांतून व्हायरल झाले होते. ते मनोज जरांगे पाटील यांना उद्देशून म्हटल्याचे व्हिडिओबरोबर सांगण्यात येत होते. मी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत बोललो नसून आमच्या काही कार्यकर्त्यांसाठी वापरल्याचे आमदार शिंदे यांनी सांगितले.

आमदार शिंदे यांनी सोलापुरात सुरू झालेल्या साखळी उपोषणाला पाठिंबा देत आपल्या विधानाबद्दल जाहीर दिलगिरी व्यक्त केली आहे. पण त्यानंतरही त्यांच्याविषयी मराठा समाजाच्या भावना तीव्र असल्याचे चित्र आहे.

Babanrao Shinde News
Gunratna Sadavarte : सदावर्तेंनी नव्या वादास तोंड फोडले; " शरद पवार, ठाकरेंनी मराठा आरक्षणाचा..."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com