Dr Subhsh Bhamre sarkarnama
नाशिक

खासदारच असुरक्षित... तिथे सामान्यांची काय कथा!

भाजपचे माजी संरक्षण राज्यमंत्री तथा विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांना डेंगी, चिकूनगुनीयाची लागण झाली. अशा वातावरणात स्वतः खासदार सुरक्षित नाहीत.

Sampat Devgire

धुळे : शहरात डेंगीचा (Dengue) उद्रेक (Eruption) अद्याप कायम आहे. त्यात भाजपचे (BJP) माजी संरक्षण राज्यमंत्री (Ex minister of state) तथा विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे (Dr Subhash Bhamre) यांना डेंगी, चिकूनगुनीयाची (Chikunguniya) लागण झाली. अशा वातावरणात स्वतः खासदार सुरक्षित (Insecure) नाहीत, तर सर्वसामान्यांचे काय, असा प्रश्‍न धुळेकरांपुढे असून नवनिर्वाचीत महापौर प्रदीप कर्पे (Pradip Karpe) यांच्यापुढे सुस्त मनपा यंत्रणेला कामाला लावण्याचे खडतर आव्हान आहे.

मोठा गाजावाजा करीत नुकतेच भाजपचे महापौर पदावर विराजमान झाले. मात्र त्या पाठोपाठ चिकूनगुनीया, व्हायरल फ्लू व घशाला इन्फेक्शन आदी साथीच्या आजारांचा जोर कायम आहे. त्यांनी बालकांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना जेरीस आणले आहे.

महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. त्यात पावसाळ्यापूर्वी मलेरियासह विविध साथीचे आजार नियंत्रित राहण्यासाठी, डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी रासायनिक फवारणीचा तब्बल १४ कोटी रुपयांहून अधिक रकमेचा ठेका दिला गेला. त्यात बहुचर्चित वाटेहिस्से पडल्याने कुणीही ठेकेदार काय काम करतो हे पाहण्याची काही तसदीच घेतली नाही. डेंगीचा उद्रेक झाल्यानंतर ॲन्टीजन आणि एलायझा टेस्टच्या नावाखाली महापालिकेच्या यंत्रणेने सर्व काही आलबेल आहे, असे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला. एलायझा टेस्ट केली तर डेंगी मानू, असा महापालिका यंत्रणेचा अट्टहास राहिला. तर खासगी वैद्यकीय व्यावसायिक ॲन्टीजन टेस्टच्या आधारे डेंगीच्या रुग्णांवर उपचार करत आहेत

प्रचंड अंगदुखी, शंभर अंश सेल्सिअसवर ताप, प्लेटलेटस्‌ कमी होणे आदी निदानावर वेळ न दवडता खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी रुग्णांवर उपचार सुरू ठेवले आहेत. खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांना जागा नाही, अशी गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. यात खासदार डॉ. भामरे यांना डेंगी, चिकूनगुनीयाने पछाडल्यानंतर ते विशेष विमानाने मुंबईतील हिंदुजा रूग्णालयात उपचारासाठी गेले.

भाजपचेच खासदार महापालिकेतील या पक्षाच्या सत्ता काळात सुरक्षित नाहीत, तर सर्वसामान्यांचे काय, त्या १४ कोटींच्या निधीतील ठेक्याचे काय, असे विविध प्रश्‍न धुळेकर उपस्थित करत आहेत. नेमका हाच प्रश्‍न महापौर कर्पे यांच्यासाठी आव्हानात्मक आहे. डेंगीमुळे शहरात पावणेसात वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला आहे. शहरात कचरा संकलन नाही, घंटागाड्या दिसत नाहीत, खड्ड्यांमुळे रस्त्यांची वाट लागलेली, पावसाळ्यामुळे सर्वत्र अस्वच्छता व रोगराईचे वातावरण झाल्यामुळे नागरिकांच्या जिवाचे मोल महापालिकेला आहे की नाही, असा गंभीर प्रश्‍नही उपस्थित केला जात आहे. महापौर कर्पे हे प्रश्‍न कसे मार्गी लावतात यावर भाजपची प्रतिमा, प्रतिष्ठा अवलंबून असेल.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT