Chhagan Bhujbal- Suhas Kande Sarkarnama
नाशिक

आमदार सुहास कांदेंच्या प्रकरणापुढे पोलिसांचही डोकं चालेना...

नाशिक पोलिसांनी (Nashik Police) पुन्हा सुहास कांदे (Suhas Kande) आणि अक्षय निकाळजे (Akshay Nikalje) यांना जबाबसाठी पुन्हा बोलवले..

सरकारनामा ब्यूरो

नाशिक : पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याविरुद्ध उच्च न्यायालयात दाखल केलेल याचिका मागे घेण्यासाठी धमविल्याप्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर आज (ता.२) आमदार सुहास कांदे यांनी पोलीस आयुक्तालयात येवून आपला जबाब नोंदविला. याच प्रकरणात साक्ष देण्यासाठी अक्षय निकाळजे हे आज न आल्याने ते सोमवारी (ता.८) आपला जबाब नोंदविणार आहेत.

जिल्हा नियोजन समितीत निधी वाटपावरुन झालेल्या वादानंतर आमदार कांदे यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या विरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सदरची याचिका मागे घेण्यासाठी आमदार कांदे यांना फोनवरुन अक्षय निकाळजे यांनी छोटा राजन यांचा पुतण्या असल्याचे सांगून धमकी दिली असे म्हणत आमदार कांदे यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज सादर केला होता. या अर्जावरुन गंगापूर पोलीसांनी प्राथमिक चौकशी केली. मात्र दोन्ही पक्षांकडून आपापले फोन कॉलचे डिटेल्स न दिल्याने पोलीसांनी तसा अहवाल पोलीस आयुक्त यांना सादर केला. त्यामुळे या प्रकरणात कोण करं बोलतयं आणि खोटं सांगतय हे स्पष्ट होत नसल्याने पोलिसांचही डोकं चालेना, अशी परिस्थिती झाली आहे.

यात काहीच निष्पन्न होत नसल्याने पोलीस आयुक्त दीपक पांडे यांना दोघांना पुन्हा जबाब नोंदविण्यासाठी मंगळवारी (ता.२) पोलीस आयुक्तालयात बोलावले. सकाळी अकराच्या सुमारास आमदार कांदे यांनी आपला जबाब पोलीस आयुक्तापुढे नोंदविला. त्यानंतर दुपारी चारला अक्षय निकाळजे यांचा जबाब नोंदविला जाणार होता. मात्र ते नाशिकला न आल्याने आता या प्रकरणी त्यांचा ८ नोव्हेंबर रोजी जबाब नोंदविला जाणार आहे. या जबाबातून तरी या प्रकरणाच्या तपासाला काही चालना मिळेल, अशी अपेक्षा पोलिसांना आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT