ajit pawar devyani pharande sarkarnama
नाशिक

Devyani Pharande : आमदार देवयानी फरांदे यांच्या मार्गात राष्ट्रवादीचा स्पीडब्रेकर?

Sampat Devgire

Nashik News : विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. शहरातील भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनीही गाठीभेटींनी प्रचार सुरू केला आहे. मात्र, त्यांच्या मार्गात सहकारी पक्षांच्या इच्छुकांचा मोठा अडसर निर्माण झाला आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानाने भारतीय जनता पक्षाला ( bjp ) धोक्याचा इशारा मिळाला आहे. नाशिक मध्य मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराला अतिशय नगण्य आघाडी आहे. त्याचा परिणाम विधानसभा मतदानावर होईल का? हा आमदार फरांदे यांच्यासाठी चिंतेचा विषय आहे.

नाशिक मध्य मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अतिशय नियोजनबद्ध बांधणी सुरू आहे. माजी महापौर वसंत गीते यांचे आमदार फरांदे ( devyani Pharande ) यांना मोठे आव्हान आहे. त्यामुळे ही निवडणूक अतिशय चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.

भाजप अडचणीतून मार्ग काढत असतानाच महायुतीच्या सहकारी पक्षांनी आमदार फरांदे यांना नव्या समस्या निर्माण केल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहर अध्यक्ष रंजन ठाकरे यांनी उमेदवारीची घोषणा केली आहे. शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनाही आमदारकीची स्वप्ने पडू लागली आहेत.

आधीच अँटी इन्कम्बन्सी असलेल्या आमदार फरांदे यांच्या उमेदवारीत सहकारी पक्षांचे इच्छुक मोठा अडथळा ठरू शकतात. त्यातून कसा मार्ग काढायचा ही मोठी समस्या आमदार फरांदे यांच्यापुढे आहे.

दोन टर्म आमदार असलेल्या फरांदे यंदा 'हॅटट्रिक'साठी प्रयत्न करतील. आगामी मंत्रिमंडळ विस्तारात आमदार फरांदे यांचे नाव चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक मध्य मतदारसंघात अतिशय वेगवान राजकीय घडामोडी घडत आहेत. या घडामोडी महायुतीची डोकेदुखी ठरण्याची चिन्हे आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहर अध्यक्ष रंजन ठाकरे यांनी उमेदवारीची घोषणा केली आहे. शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनाही आमदारकीची स्वप्ने पडू लागली आहेत.

( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT