Teachers constituency news : शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत चांगली चुरस निर्माण झाल्याचे चित्र आहे. महायुतीचे उमेदवार आमदार किशोर दराडे यांच्यासाठी आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मैदानात उतरले असून ते आता दराडे यांचा प्रचार करणार आहेत.
नाशिक (Nashik) विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत आमदार दराडे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार आहेत. आमदार दराडे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी दौरा करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक, शिर्डी आणि जळगाव येथे संस्था चालकांच्या बैठका घेणार आहेत. या बैठकीत ते या संस्थाचालकांना काय आवाहन करतात याची उत्सुकता आहे.
या निमित्ताने शिक्षक मतदार संघाचा प्रचार होणार संस्थाचालक आपल्या मागण्या रेटणार अशी चर्चा शिक्षक वर्गात होत आहे.विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्र्यांनी थेट प्रचारात उतरणे हे फार कमी वेळा झाले आहे. मात्र सध्याच्या राजकीय स्थितीत महाराष्ट्रात आपला प्रभाव सिद्ध करण्याचे आव्हान शिंदे यांच्यापुढे आहे. त्यामुळे त्यांनी एक एक आमदार निवडून आणण्यासाठी देखील आपली प्रतिष्ठा आणि पत देखील पणाला लावल्याचे दिसते.
नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्रात जोरदार फटका बसला आहे. महायुतीचे अनेक उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. यामुळे महायुतीच्या नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून नाराजी पसरली आहे. पराभवाचे खापर एकमेकांवर फोडले जात आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीत मुख्यमंत्री (CM) शिंदे विशेष परिश्रम घेताना दिसत आहेत. शुक्रवारी भाजपने आमदार दराडे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री शिंदे यांचा हा दौरा शिक्षकांसाठी किती फलदायी ठरतो याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे.
(Edited by : Chaitanya Machale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.