Ajit Pawar, Sharad Pawar Sarkarnama
नाशिक

Ajit Pawar : वयाच्या ८५ व्या वर्षी आशीर्वादच द्यावेत, अजितदादांच्या निशाण्यावर पुन्हा पवार ?

Political News : उपमुख्यमंत्री अजित पवार सातत्याने शरद पवार यांच्या वयाकडे अंगुलीनिर्देश करीत आहेत.

Sachin Waghmare

अरविंद जाधव

Nashik News : राष्ट्रवादी काँग्रेसमधून वेगळे झाल्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका करीत असतात. विशेषता त्यांच्या वयाच्या मुद्यावरून त्यांची कोंडी करण्याची एकही संधी अजित पवार सोडत नाहीत. नाशिक येथील एका कार्यक्रमप्रसंगी त्यांनी पुन्हा एकदा ज्येष्ठांनी आशीर्वाद द्यावेत, असे म्हणत टीका केली.

वयाची ८०-८५ वर्ष गाठल्यानंतर ज्येष्ठांनी आशीर्वाद द्यावेत आणि योग्य वेळी मार्गदर्शन करावे, असा उपरोधिक टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांचे नाव न घेता लगावला. शरद पवार यांच्यापासून दूर झाल्यानंतर अजित पवार सातत्याने शरद पवार यांच्या वयाकडे अंगुलीनिर्देश करीत आहेत. सुविचार गौरव पुरस्कार वितरणाच्या निमित्ताने आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते.

अजित पवार आणि शरद पवार यांच्यात दुरावा निर्माण झाल्यापासून अजित पवार शरद पवारांना थांबण्याचा सल्ला देत आहेत. आजही त्यांनी आपली खंत बोलून दाखवली. सुविचार गौरव पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी शेतकऱ्यांप्रती सरकार सकारात्मक निर्णय घेत असल्याचे सांगितले.

राज्य सरकारला शेतकऱ्यांबद्दल आस्था असून, त्यांच्या अनेक प्रश्न सोडविण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. मात्र, या सर्व प्रवासात आता ८०-८५ वय असणाऱ्यांनी मार्गदर्शक भूमिकेतून आशीर्वाद द्यावेत, असा उपरोधिक टोला शरद पवार यांना लगावला. ज्येष्ठांनी थांबले तर, नव्यांना संधी मिळेल, असे अजित पवारांनी (Ajit pawar) सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

म्हणून भुजबळ वंदे भारत पकडतात

मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था झाली आहे. इगतपुरीपर्यंत सुसाट जाणाऱ्या वाहनांचा वेग मात्र पुढे वाहतूक कोंडीमुळे मंदावतो. वाहतूक कोंडी असह्य असल्याने आमचे छगन भुजबळ (Chagan Bhujbal) चार वाजता असलेली वंदे भारत एक्सप्रेस पकडतात, असे अजित पवार यांनी सांगताच, उपस्थितांमध्ये हशा पिकला.

त्यासोबतच पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाचे काम रखडले आहे. हा प्रकल्प नाशिकच्या दृष्टीने महत्वाचा आहे. यासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे. नाशिक-मुंबई हायवेचेही काम लवकरच मार्गी लागेल, याकडे पवारांनी लक्ष वेधले.

SCROLL FOR NEXT