Chandrashekhar Bawankule : लोकसभेसाठी महायुतीचा पहिला उमेदवार ठरला, बावनकुळेंनी 'या' नावाची केली घोषणा

Lok Sabha Election 2024 : बच्चू कडूंच्या इशाऱ्यानंतर भाजप 'अलर्ट' मोडवर...
Eaknath Shinde, Devendra Fadanvis, Ajit pawar
Eaknath Shinde, Devendra Fadanvis, Ajit pawar Sarkarnama
Published on
Updated on

Amravati News : लोकसभेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपले असताना अनेक राजकीय पक्षांनी आघाड्यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. अशातच राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या सरळ लढत असणार असल्याचे दिसत असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका कार्यक्रमांमध्ये महायुतीचा पहिला उमेदवार जाहीर केला आहे.

अमरावती लोकसभेसाठी खासदार नवनीत राणा यांच्या नावाची घोषणा करून टाकली. आमदार बच्चू कडू यांनी अमरावती लोकसभेची जागा आम्हाला सोडावी किंवा नवनीत राणा यांनी प्रहारच्या तिकीटावर लढावं असा इशारा महायुतीला दिला होता. त्यामुळे आता महायुतीमध्ये जागा वाटपावरून मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे.

Eaknath Shinde, Devendra Fadanvis, Ajit pawar
Maratha Reservation: मराठा आरक्षणावर एका वाक्यात उत्तर द्या, मंत्री शंभूराजे देसाई असे का म्हणाले...

बच्चू कडूंनी महायुतीला इशारा देत असतानाच कालच प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी अमरावती लोकसभेत आपल्याकडे दोन आमदार असल्यास सांगत अमरावती लोकसभेची जागा आम्हाला मिळावी किंवा खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी प्रहारच्या तिकिटावर लढावं इशाराच महायुतीला दिल्याने महायुतीमध्ये टेंशन वाढवल होते.

मात्र बच्चू कडूंनी महायुतीला अमरावतीच्या जागेवरून इशारा दिल्यानंतर महायुती एकदमच अलर्ट मोड वर आल्याचा दिसून आलं. त्यांच् दिवशी सायंकाळी एका खासगी कार्यक्रमात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावती लोकसभेच्या जागेसाठी महायुतीचा पहिला उमेदवारच जाहीर केला. यासाठी अमरावतीच्या विद्यमान खासदार नवनीत राणा ह्या महायुतीच्या उमेदवार असेल असे त्यांनी यावेळी सांगून टाकले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राणा म्हणाल्या, आमच्या जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे यासाठी रवी राणा आणि 2014 मध्ये विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पाठिंबा दिला होता व 2019 मध्ये मी सुद्धा मोदीजींना पाठिंबा दिला तेव्हाही आम्ही सोबत होतो आणि उद्या आम्ही सोबत राहू असे त्यावेळी त्यांनी सांगितलं.

कमळाच्या तिकिटावर लढणार का?

यापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका कार्यक्रमात म्हटले होते की येणाऱ्या लोकसभेमध्ये अमरावतीच्या जागेवर कमळ या चिन्हाचा उमेदवार असेल.मात्र आज नवनीत राणा यांना विचारलं असता आम्ही यापूर्वी अपक्ष लढलो आणि आम्ही युतीचे घटक म्हणून युती सोबत आहे. आणि ते सगळे निर्णय महायुतीमध्ये घेतल्या जाईल. आमदार रवी राणा जागा वाटपामध्ये आपल्या पक्षासाठी जागा मागतील.त्यामुळे नवनीत राणा कमळाच्या चिन्हावर लढेल की भाजपच्या पाठिंबावरील असा प्रश्न आता उपस्थित होत आह.

Eaknath Shinde, Devendra Fadanvis, Ajit pawar
Parbhani Shivsena News : मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वीच सईद खान यांचा काँग्रेसला दणका...

एकीकडे आमदार बच्चू कडू यांनी अमरावतीच्या लोकसभेच्या जागेवर दावा केला असताना शिंदे गटाचे माजी खासदार आनंदराव अडसुळ यांनी सुद्धा या जागेवर आपला दावा केला आहे.मात्र, महायुतीमध्ये जो वाकड चालेल त्याला आम्ही सरळ करू असा इशारा देखील रवी राणांनी बुधवारी( ता.3) कडूना दिला होता. वआता चक्क भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी अमरावतीच्या लोकसभेच्या जागेसाठी उमेदवार जाहीर केल्याने महायुतीमध्ये रस्सीखेच होताना दिसून येत असतानाच महायुतीच मिठाचा खरा पडेल काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Eaknath Shinde, Devendra Fadanvis, Ajit pawar
Udayanraje Bhosale News : 'त्या' विकृत लोकांवर कडक कारवाई करा..!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com