Sharad Pawar News Sarkarnama
नाशिक

Loksabha Election : धुळे लोकसभेसाठी शरद पवारांना पाठबळ; आसिफ शेख रशीद तयारीत

Arvind Jadhav

Dhule News : धुळे-मालेगाव लोकसभा मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसमध्ये लढत होणार की, शिंदेची शिवसेना येथे एंट्री घेते, याची चर्चा सुरू असताना राष्ट्रवादीकडून (शरद पवार गट) आसिफ शेख रशीद हे मैदानात उतरण्याची शक्यता आहे. काँग्रेसचा दोन टर्ममध्ये दारूण पराभव झाला आहे. त्यामुळे आपण निवडणूक लढवावी, अशी मागणी पुढे येत असल्याचे आसिफ शेख रशीद यांनी स्पष्ट केले.

धुळे-मालेगाव लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाकडून दावा करण्यात येतो आहे. मात्र, काँग्रेसला सतत अपयश येते आहे. आपण यापूर्वी शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेऊन धुळे लोकसभेच्या जागेवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराला संधी द्यावी, अशी मागणी केली होती, असे शेख यांनी स्पष्ट केले.

माजी आमदार शेख रशिद हयातीत असताना त्यांनी सुद्धा याचा पाठपुरावा केला होता. मतांचे प्रमाण लक्षात घेता शेख रशीद यांना उमेदवारी देण्याची चर्चा झाली होती. आता शेख रशीद हयात नाहीत. मात्र, त्यांची मागणी रास्तच होती आणि ती यावेळी पूर्ण होईल, अशी अपेक्षा शेख आसिफ (Shaikh Asif) यांनी व्यक्त केली.

धुळे लोकसभेमध्ये सहा विधानसभा मतदार संघांचा अंतर्भाव आहे. यातील धुळे शहर, धुळे ग्रामीण आणि सिंधखेडा या तीन विधानसभा मतदारसंघात एक आणि मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य आणि बागलाण मतदार विधानसभा मतदारसंघात एक अशा दोन टीम तयार करण्यात आल्या आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेणार

ही पथके मतदारसंघात फिरून पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेतील. नागरिकांचे मत जाणून घेण्यात येतील. या पथकांचा अहवाल आल्यानंतर लागलीच शरद पवार यांची भेट घेतली जाईल. धुळे लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने मुस्लीम उमेदवार देऊन अल्पसंख्यकांना सामावून घेण्याचा प्रयत्न करावा, असा आग्रह धरला जाईल, असे शेख यांनी स्पष्ट केले.

(Edited By Sachin Waghmare)

SCROLL FOR NEXT