Sanjay Raut, Uddhav Thackeray Sarkarnama
नाशिक

Uddhav Thackeray Nashik Visit : संजय राऊतांचे खूप झाले दौरे, आता उद्धव ठाकरेच उतरणार नाशिकच्या मैदानात

Maharashtra Politics News : विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच माजी मुख्यमंत्री व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे 16 एप्रिलला नाशिकमध्ये येत आहेत.

Ganesh Sonawane

Nashik News : लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाला नाशिकमध्ये अपेक्षित यश मिळालं पण विधानसभा निवडणुकीत गणितं फिरली. विधानसभेच्या धक्कादायक निकालानंतर शिवसेना ठाकरे गटाला नाशिकमध्ये गळती सुरु झाली. अनेक पदाधिकारी अन्य पक्षात गेले. आगामी महापालिकेची निवडणूक लक्षात घेता ही गळती परवडणारी नाही म्हणून डॅमेज कंट्रोलसाठी अनेकदा खासदार संजय राऊत यांचे नाशिकमध्ये दौरे झाले.

पण आता पक्षाला उभारी देण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे स्वत: नाशिकच्या मैदानात उतरणार आहेत.

विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच माजी मुख्यमंत्री व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे 16 एप्रिलला नाशिकमध्ये येत आहेत. शहरातील मनोहर गार्डन येथे त्यांचे एकदिवसीय संवाद शिबीर होणार आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 6 या दरम्यान शिबीर पार पडेल.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसैनकांचे मनोबल वाढविण्यासाठी पक्षाच्या तज्ज्ञांसह नेत्यांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची कारणे समजून घेतली जाणार आहेत. पक्षप्रमुख ठाकरे यांच्यासह खासदार संजय राऊत, पक्षाचे वरिष्ठ नेते व तांत्रिक तज्ज्ञ या शिबीरात मार्गदर्शन करतील.

दरम्यान हे शिबीर यशस्वी करण्यासाठी ठाकरे गट कामाला लागला आहे. त्यासाठी जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांकडून विभागीय बैठका घेण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात 3 ते 5 एप्रिलदरम्यान शहरात विभागनिहाय बैठका होणार आहेत. तर 6 ते 9 एप्रिल दरम्यान जिल्ह्यात तालुकानिहाय बैठका होणार आहेत. त्याचप्रमाणे येत्या काही दिवसात शिबिरांच्या अनुषंगाने विविध समिती स्थापन करण्यात येणार आहे, अशी माहिती ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

दरम्यान आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वीच नाशिकमध्ये ठाकरे गटाने स्थानिक पातळीवर पक्ष संघटनेत मोठे फेरबदल केले होते. त्यात सुधाकर बडगुजर यांची उपनेतेपदी तर उपजिल्हाप्रमुख डी.जी. सूर्यवंशी यांची जिल्हाप्रमुखपदी बढती करण्यात आली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यादरम्यान पुन्हा आणखी काही फेरबदल पक्षात होतात का तेही पाहावे लागणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT