Samajwadi Party MLA Rais Shaikh during political discussions as his close aide Tariq Momin’s name gains momentum in the Bhiwandi-Nizampur Municipal Corporation Sarkarnama
नवी मुंबई

Rais Shaikh : महाराष्ट्रात 'उत्तर भारतातील' पक्षाचा पहिला महापौर बसणार? : काँग्रेस अन् NCP प्लसमध्ये; समाजवादी पक्षाचा आमदार 'किंगमेकर'

Bhiwandi Mayor Race : समाजवादी पक्षाचे आमदार भिवंडी-निजामपूर महापालिकेत बहुमताच्या गणितात समाजवादी आमदार रईस शेख किंगमेकर ठरले असून, विश्वासू तारिक मोमीन यांचे नाव महापौरपदासाठी आघाडीवर आहे.

सरकारनामा ब्यूरो

Bhiwandi Nizampur municipal corporation : भिवंडी-निजामपूर महापालिकेचे महापौरपद 'खुले' झाल्याने राजकीय गणितांना वेग आला आहे. महापालिकेत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी सत्तेच्या या सारीपाटात समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख हे 'किंगमेकर'च्या भूमिकेत आले आहेत. त्यांच्या पसंतीचे निकटवर्तीय तारिक मोमीन यांच्या नावाची चर्चा सध्या महापौरपदासाठी आघाडीवर आहे.

निवडणुकीच्या निकालात काँग्रेसचे 30 नगरसेवक निवडून आले आहेत. त्यापैकी आमदार रसई शेख यांच्या भिवंडी पूर्व मतदारसंघातील विधानसभा क्षेत्रातील 24 नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे 12 नगरसेवक निवडून आणण्यामागे आमदार रईस शेख यांचा मोठा वाटा असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे सत्तेच्या चाव्या त्यांच्याकडेच राहण्याची दाट शक्यता आहे.

बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 46 या आकड्यापर्यंत पोहोचण्यासाठी काँग्रेस (30) आणि राष्ट्रवादी (12) या आघाडीला अवघ्या चार सदस्यांची गरज आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी (6), कोणार्क (4) आणि भिवंडी विकास आघाडी (3). या समीकरणामुळे भाजपला सत्तेपासून दूर ठेवून काँग्रेस पुन्हा एकदा महापालिकेत सत्तेवर आरूढ होण्याची चिन्हे स्पष्ट आहेत.

काँग्रेसच्या निवडून आलेल्या 30 सदस्यांमध्ये अनुभवी नेत्यांची संख्या कमी असून, अनेक जण नवखे आहेत. अशा स्थितीत, प्रशासकीय कामाचा अनुभव असलेले आणि आमदार रईस शेख यांचे विश्वासू सहकारी तारिक मोमीन यांचे नाव महापौरपदासाठी आघाडीवर आहे. त्यांच्या नावामुळे काँग्रेस आणि मित्रपक्षांमध्ये एकवाक्यता निर्माण होऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

...तर उपमहापौर राष्ट्रवादीचा

माजी उपमहापौर इमरान खान यांनी सत्तेबाबतचा विश्वास व्यक्त करताना सांगितले की, "आमचे सत्तासमीकरण स्पष्ट आहे. महापौर काँग्रेसचा आणि उपमहापौरपद राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडे असेल. ही आघाडीच भिवंडीचा विकास करेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT