Government officials’ residences in Maharashtra undergoing expensive renovations, drawing public attention and criticism. Sarkarnama
नवी मुंबई

Government Residence Expenses : होऊ द्या खर्च! तुकाराम मुंढेंनंतर आता नार्वेकर, राम शिंदे अन् भरणेंच्या बंगल्यांचा थाट

Massive Government Spending on Officials’ Residences in Maharashtra : प्रा. राम शिंदे आणि राहुल नार्वेकर या दोघांच्या निवासस्थानांना हायटेक लुक देण्यासाठी तब्बल एक कोटी पाच लाख रुपयांचा खर्च केला जाणार आहे.

सरकारनामा ब्यूरो

Rahul Narwekar, Ram Shinde, and Dattatray Bharane Residences Under Spotlight : IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या मुंबईतील मलबार हिलमध्ये येथील शासकीय निवासस्थानाच्या नुतणीकरणावर काही लाखांचा खर्च झाल्याचे नुकतेच समोर आले होते. आता त्यांना नेत्यांनी मागे टाकले असून त्यांच्या घरांच्या नुतणीकरणासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे. त्यामध्ये कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचाही समावेश आहे.

विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नागपूर येथील रविभवन परिसरातील अधिकृत निवासस्थानांचाही मेकओव्हर केला जात आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही कामे सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये आता भरणे यांची भर पडली आहे.

प्रा. शिंदे आणि नार्वेकर या दोघांच्या निवासस्थानांना हायटेक लुक देण्यासाठी तब्बल एक कोटी पाच लाख रुपयांचा खर्च केला जाणार आहे. भरणे यांनी या दोघांनाही मागे टाकले आहे. त्यांच्या कॉटेज क्रमांक 29 या बंगल्यासाठी सुमारे एक कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.

राहुल नार्वेकर यांचा बंगला क्रमांक 9 तर प्रा. शिंदे यांचा बंगला क्रमांक 18 चे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते. छत, भिंती आणि संरचनेत त्रुटी आढळून आल्यानंतर तातडीने दुरूस्तीचा निर्णय घेण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीलखाली खासगी कंपनीकडून ही कामे करून घेतली जात आहेत.

बंगल्याच्या छतांना आणि भिंतींना वाळवी लागली आहे. त्यामुळे त्यासाठी विशेष रासायनिक प्रक्रिया केली जाणार असून दोन्ही बंगले हायटेक केले जाणार आहेत. भरणे यांच्या निवासस्थानाचाही संपूर्ण कायापालट केला जाणार आहे. त्यासाठी नार्वेकर आणि शिंदेंच्या बंगल्यांवर होणाऱ्या खर्चापेक्षा अधिकचे बजेट प्रस्तावित आहे.

दरम्यान, माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यानंतर दत्तात्रय भरणे यांच्याकडे कृषि खाते आले आहे. त्यानंतर राज्यात तुफान पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले. लाखो शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली. दिवाळीपूर्वी राज्य सरकारने सुमारे 32 हजार कोटींचे मदतीचे पॅकेज जाहीर केले. पण अनेक शेतकऱ्यांपर्यंत अजूनही मदत पोहोचलेलीच नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT