Narayan Rane, Uddhav Thackeray sarkarnama
नवी मुंबई

नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना हात जोडले ; ठाकरे-राऊतांवर भाष्य करण्याची गरज नाही !

संजय राऊत आणि उद्धव ठाकरे हे राजकीयदृष्टया आता संपलेले आहे, अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे.

सरकारनामा ब्युरो

नवी मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर (Maharashtra Political Crisis) सातत्याने शिवसेनेवर हल्लाबोल केला जात आहे. भाजप नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर प्रहार केला आहे. खासदार संजय राऊत (Sanjay Raut), माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावरही निशाणा साधलाय. (Narayan Rane news update)

उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यावर बोचरी टीका केली. राणे नवी मुंबईत माध्यमांशी बोलत होते. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे हे राजकीयदृष्टया आता संपलेले आहे, अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे.

"गेल्या काही दिवसापासून घडलेल्या घटनांमुळे उद्धव ठाकरेंवर हात जोडण्याची वेळ आली आहे, त्यामुळे त्यांच्यावर भाष्य करण्याची आता गरज नाही," असा टोला नारायण राणे यांनी लगावला आहे.

नवी मुंबईतील एका कार्यक्रमात राणेंना उद्धव ठाकरेंबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा राणेंनी बोचऱ्या शब्दात त्यांच्यावर निशाणा साधला. शिंदेंचे मंत्रीमंडळ होणार नाही, असा प्रश्न राणेंना विचारला असता ते म्हणाले, "मंत्रीमंडळ झाले आहे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविषयीच्या प्रश्नाला मी उत्तर देणार नाही. आज ते कोणी नाही, उद्धव ठाकरेंच्या रागावण्याला आता काहीही अर्थ नाही,"

काही दिवसापूर्वी राणेंनी राऊतांवर टीका केली होती. आपण ज्योतिषी असून हे सरकार पडणार असल्याचे भाकीत केले होते असंही त्यांनी सांगितलंय. तसच संजय राऊत हे धुतल्या तांदळासारखे स्वच्छ नाहीत, काहीतरी केलं म्हणूनच गुन्हा दाखल झाला असाही प्रहार त्यांनी केलाय. त्यामुळे आता राणेंच्या या टीकेला उद्धव ठाकरे, संजय राऊत काय उत्तर देतात, याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT