शिंदे सरकारमध्ये मंत्रीपद मिळेल का ? पंकजा मुंडे म्हणाल्या..

शिंदे सरकारमध्ये पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांचा मंत्रीमंडळात समावेश करण्याची मागणी मुंडे समर्थक करीत आहेत
Pankaja Munde News in Marathi, Beed News
Pankaja Munde News in Marathi, Beed NewsSarkarnama
Published on
Updated on

औरंगाबाद : भाजप आणि शिंदे गटाचे सरकार (Shine Government) आल्यानंतर भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना मंत्रीपद मिळावं, यासाठी त्यांचे कार्यकर्ते आग्रही आहेत.काही दिवसापूर्वी बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी बीड ते मोहटा देवी पायी दिंडी काढत पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळावं, यासाठी साकड घातलं. (Pankaja Munde latest Marathi news)

अनेक वेळा भाजपकडून मुंडेंना आमदारकीसाठी हुलकावणी मिळाली असली तरी जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांना मंत्रिपद मिळावं, यासाठी महिला कार्यकर्त्यांनी ही पायी दिंडी काढली होती. आधी राज्यसभा,नंतर विधान परिषद निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्या नावाची चर्चा होती. मुंडे समर्थकांनीही याबाबत आक्रमक भूमिका घेतली होती.

राज्यातील नव्या शिंदे सरकारमध्ये पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांचा मंत्रीमंडळात समावेश करण्याची मागणी मुंडे समर्थक करीत आहेत. याबाबत पंकजा मुंडे यांना पत्रकांरानी प्रश्न विचारला असता त्यांनी त्यावर बोलणं टाळलं. त्या पत्रकारांशी बोलत होत्या.(Beed Latest Marathi News)

Pankaja Munde News in Marathi, Beed News
Shivsena: शिवसेनेच्या प्रत्येक फुटीमागे शरद पवार ; दीपक केसरकरांचा गंभीर आरोप

मुंडे समर्थक आता तरी पंकजा मुंडे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला पाहिजे अशी मागणी करत असल्याबाबत प्रश्न विचारला असता पंकजा यांनी त्यावर त्यांनी उत्तर देणं टाळलं. यावेळी त्यांनी तेथे उपस्थित दुसऱ्या पत्रकाराला तुमचा प्रश्न काय असं विचारलं.

ओबीसींच्या हिताचं सरकार

ओबीसी आरक्षणावर विचारलेल्या प्रश्नावर मुंडे म्हणाल्या, "आता ओबीसींच्या हिताचं सरकार आहे. त्यामुळे ओबीसींचं राजकीय आरक्षण मार्गी लागेल. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल असा मला पूर्ण विश्वास आहे. गेल्या अडीच वर्षात सरकारने कोणताही कागद हलवला नाही, कुठलंही काम केलं नाही,”

फडणवीसांना विनंती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली आहे की ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नये, या निवडणुका ओबीसी आरक्षणासहच होतील असा विश्वास त्यांनी दिला आहे. न्यायालयाने १९-२० जुलैला तारीख दिली आहे. त्यात यावर स्पष्टता येईल. मात्र, ओबीसींवर अन्याय होणार नाही अशाप्रकारचा निर्णय यातून व्हावा अशी आमची अपेक्षा आहे,” असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com