Panvel Double Voter: रायगड विधानसभा मतदारसंघातील खोपोलीनंतर आता पनवेलमध्ये मोठ्या प्रमाणावर दुबार मतदारनोंदणी झाल्याचं उघड झाल्यानं खळबळ उडाली आहे. पण इथं नेमकं काय घडलंय? ज्यामुळं हा मुद्दा खूपच चर्चेत आला आहे.
लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी मतचोरीच्या मुद्द्यावरुन देशभरात रान उठवलं आहे. त्यांना सर्वच प्रमुख विरोधीपक्षांनी साथ दिली आहे. या मतचोरीच्या मुद्द्यामध्ये मतदार याद्यांमधील घोळ प्रामुख्यानं पुढे आले आहेत. देशभरात अशा सदोष मतदार याद्यांमुळं त्याचा निवडणुकांवर गंभीर परिणाम झाल्याचं सांगितलं जात आहे.
महाराष्ट्रात चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, पालघर जिल्ह्यांमध्ये मतदार याद्यांमध्ये दुबार मतदार असल्याचं समोर आलं आहे. यानंतर रायगड जिल्ह्यातील मतदार याद्यांमध्ये देखील असाच घोळ असल्याचं उघड झालं आहे. खोपोलीनंतर आता पनवेलमध्ये तब्बल ८५,२११ दुबार मतदार असल्याचं समोर आलं आहे. यावरुन शेतकरी कामगार पक्ष आक्रमक झाला असून मतदारांनी दोनदा मतदान करुन लोकशाहीला हरताळ फासला असल्याचा आरोप शेकापचे नेते बळीराम पाटील यांनी केला आहे.
पनवेलमध्ये जे ८५,२११ दुबार मतदार आढळले आहेत, त्यांपैकी २५,८५५ मतदारांचं पनवेल मतदारसंघातील यादीत दोनदा नाव असल्याचं उघड झालं आहे. तर पनवेल आणि उरण या दोन्ही ठिकाणी नावं असलेले २७,२७५ मतदार आहेत. तसंच ऐरोली मतदारसंघात १६,०९६, पनवेल आणि बेलापूर मतदारसंघात १५,३९७ दुबार मतदार आहेत. तर या व्यतिरिक्त देखील ५८८ दुबार मतदार आहेत. मात्र, या उमेदवारांची कसलीच माहिती उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
याप्रकरणी माजी आमदार बाळाराम पाटील यांनी या दुबार नोंदणीबद्दल निवडणूक अधिकाऱ्यांकडं तक्रार केली आहे. तसंच यापूर्वीच त्यांनी हायकोर्टात धाव घेत रिट पिटिशनही दाखल केली आहे. त्यानंतर कोर्टानं दुबार मतदारांची नाव कमी करण्याचे आदेश दिले होते. पण तरीही ही दुबार नावं वगळली गेलेली नाहीत. खोपोलीतील प्रभाग क्रमांक १० मध्ये १४० दुबार मतदार असल्याचा आरोप आम आदमी पार्टीनं केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.