Vijay Wadettiwar Reaction on OBC Reservation Sarkarnama
नवी मुंबई

ओबीसी आरक्षणावरून वडेट्टीवार नाराज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी ओबीसींच्या राजकीय आरक्षणा बद्दल बैठक बोलावली होती.

सरकारनामा ब्युरो

मुंबई - ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. या प्रश्नावर महाविकास आघाडीतच एक वाक्यता नसल्याचे आता समोर येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी ओबीसींच्या राजकीय आरक्षणा बद्दल बैठक बोलावली असताना बैठकी पूर्वीच मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार ( Vijay Vadettiwar ) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. (Vijay Wadettiwar Reaction on OBC Reservation)

ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज ( सोमवारी ) दुपारी साडेतीन वाजता महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र या बैठकी पूर्वीच राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. (Vijay Wadettiwar News)

वडेट्टीवार म्हणाले, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा विषय ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांचा विचार करता ग्रामविकास विभागाच्या अखत्यारित येतो. ग्रामविकास मंत्र्यांनी ओबीसी वर्गाबाबत आम्हाला माहिती देणे अपेक्षित आहे.

ते पुढे म्हणाले की, ग्राम विकास खात्याअंतर्गत ओबीसी आरक्षणावर जी तयारी राज्यशासन करत आहे याबाबत माहिती दिली जात नाही. ग्रामविकास खात्याची जबाबदारी माझ्याकडे नाही. परंतु, ओबीसी नेते म्हणून आम्हाला प्रश्न विचारले जातात. मात्र, ओबीसी आरक्षणाबाबत कार्यवाही करताना आमच्या विभागाला विश्वासात घेतले जात नाही, अशी नाराजी विजय वडेट्टीवार यांनी यावेळी व्यक्त केली.

नाराजी व्यक्त केली असली तरी तिन्ही पक्षांचे सरकार असूनही आमच्यात चांगला समन्वय आहे. आमच्यात कोणत्याही प्रकारची नाराजी नाही. एखाद्या प्रश्नावर आम्ही संवादातून मार्ग काढून पुढे जातो. त्यामुळेच ओबीसींच्या आरक्षणावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आजची बैठक बोलावली होती, असे स्पष्टीकरणही विजय वडेट्टीवार यांनी दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT