Eknath Khadse & Gulabrao Patil Sarkarnama
Sarkarnama Open Mic

Jalgoan Politics; एकनाथ खडसे, गुलाबराव पाटील यांच्यात सहमतीचे राजकारण!

जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर यांनी सोमवारी राजीनामा दिल्यानंतर एकनाथराव खडसे नवीन अध्यक्षांचे नाव जाहीर करणार

Sampat Devgire

जळगाव : जळगाव (Jalgaon) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (District Bank) निवडणुकीनंतर अध्यक्ष व उपाध्यक्षपद निवडीला ठरल्यानुसार एक वर्ष पूर्ण झाले. त्यामुळे संचालकांनी अध्यक्ष बदलण्याचे ठरविले आहे. त्यानुसार अध्यक्ष गुलाबराव देवकर (Gulabrao Deokar) सोमवारी पदाचा राजीनामा देतील. यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि एकनाथ शिंदे गटाचे नेते (Eknath Shinde) गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) परस्पर यांच्यात सहमतीचे राजकारण होईल. (Eknath Khadse & Gulabrao Deokar will have mutual Consent in District Bank Politics)

नव्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर अध्यक्षपदाच्या उमेदवाराचे नावेजाहीर करण्यात येईल याबाबतचा निर्णय संचालकांनी एकमताने घेतला आहे. जिल्हयाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही त्याला सहमती दर्शविली असून उपाध्यक्षपदाबाबत शिवसेना (शिंदे गट) निर्णय घेईल अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, आमदार एकनाथराव खडसे यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.

बँकेच्या अध्यक्षपदाची एक वर्षाच मुदत पूर्ण झाली आहे. त्यामुळे त्याबाबत निर्णय घेण्यासाठी आज श्री. खडसे यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाची बैठक झाली. अध्यक्ष गुलाबराव देवकर, उपाध्यक्ष श्‍यामकांत सोनवणे, संचालक प्रदीप देशमुख, डॉ. सतीश पाटील, ॲड. रोहिणी खडसे, घन:श्‍याम अग्रवाल, शैलजाताई निकम, आमदार किशोर पाटील, ॲड. रवींद्र पाटील, संजय पवार, प्रताप हरी पाटील, जनाबाई महाजन, सुनील महाजन आदी उपस्थित होते.

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना श्री. खडसे म्हणाले, बँकेची निवडणूक झाल्यानंतर अध्यक्ष व उपाध्यक्षपदाबाबत निर्णय घेण्यात आला होता. त्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसला तीन वर्षे अध्यक्षपद, एक वर्षे शिवसेनेला आणि एक वर्षे कॉंग्रेसकडे अध्यक्षपद असेल. उपाध्यक्षपद दोन वर्षे शिवसेनेकडे, दोन वर्षे कॉंग्रेसकडे तर एक वर्षे राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे राहील असे ठरले होते, त्यानुसार दोन्ही पदासाठी एक वर्षे पूर्ण झाले आहे, त्यामुळे नियमाप्रमाणे नवीन पदाधिकाऱींनी संधी देण्यात येणार आहे.

पालकमंत्र्यांचीही सहमती

अध्यक्ष व उपाध्यक्षपदाचा एक वर्षाचा कालावधी संपल्यामुळे नवीन निवड करण्याबाबत आपण जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यांशी सभागृहातून चर्चा केली, त्यांनीही त्याला सहमती दर्शविली असल्याची माहिती श्री. खडसे यांनी दिली. उपाध्यक्षपद शिवसेनेकडे (शिंदे गट) असल्यामुळे उपाध्यक्षपदाबाबतचा निर्णय त्या पक्षाच्या संचालकांनीच घ्यायचा आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संचालकांनी अध्यक्ष बदलाचा निर्णय एकमताने घेतला. त्यामुळे विद्यमान अध्यक्ष गुलाबराव देवकर यांनी सोमवार (ता. ६) राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे खडसे यांनी सांगितले.

आमदारांच्या बैठकीत निर्णय

जिल्हा बँकेचे उपाध्यक्षपद शिवसेना (शिंदे गट) यांच्याकडे आहे. श्‍यामकांत सोनवणे हे बँकेचे उपाध्यक्ष आहेत. उपाध्यक्षपद शिवसेनेकडे दोन वर्षासाठी आहे. याबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, बँकेच्या उपाध्यक्ष बदलायचा कि त्यांनाच पुन्हा मुदतवाढ द्यायची हा निर्णय आमच्या गटाचे सर्व आमदार एकत्र बसून घेणार आहोत. त्याबाबत लवकरच निर्णय जाहीर करणार आहोत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT