Krishna Prakash Sarkarnama
पिंपरी चिंचवड

Krishna Prakash's World Record: 'आयर्नमॅन' कृष्णप्रकाशांचा आणखी एक जागतीक विक्रम; असे पोहचले 'एलिफंटा'ला

Water Sport : तरुणांनी एका तरी खेळात पारंगत असण्याची केली अपेक्षा

उत्तम कुटे

पिंपरी : पिंपरी-चिंचवडचे माजी पोलीस आयुक्त, 'आयर्नमॅन' आणि 'अल्ट्रामॅन' या जागतिक किताबाचे मानकरी, 'फिटेस्ट आयपीएस' कृष्णप्रकाश यांनी आणखी एका जागतिक विक्रमाला गवसणी घातली. 'गेटवे ऑफ इंडिया'ते एलिफंटा गुफा दरम्यानचा अरबी समुद्र पोहून काल (ता.२६) मुंबईत जाणारे ते जगातले पहिले व्यक्ती ठरले.

'केपी' या नावाने परिचित असलेले ५३ वर्षीय यांची कृष्ण प्रकाश (Krishna Prakash) यांची पिंपरी-चिंचवडचे (Pimpri-Chinchwad) पोलिस आयुक्त म्हणून कारकिर्द गाजली.सध्या ते राज्याच्या 'व्हीआय़पी' सुरक्षेचे प्रमुख (विशेष पोलिस महानिरीक्षक तथा स्पेशल आय़जी)आहेत.अत्यंत खडतर अशा आर्यनमॅन (२०१७) आणि अल्ट्रामॅन (२०१८) या जागतिक स्पर्धा त्यांनी जिंकलेल्या आहेत. हा पराक्रम करणारे देशाच्या नागरी सेवेतील ते पहिलेच आहेत. त्यानंतर काल,तर ते प्रवाहाच्या विरुद्धच पोहले आणि आणखी एका जागतिक विक्रमाचे मानकरी ठरले.

आतापर्यंत एलिफंटा गुंफा ते गेटवे अशा सरधोपट मार्गाने अनेकजण अरबी समुद्र पोहून आले आहेत. या मार्गाने लाटावर स्वार होत पोहता येत असल्याने हे अंतर कापायला अधिक त्रास होत नाही.पण, त्याउलट लाटांच्या विरोधात गेटवे ते एलिफंटा असे १६.२ किलोमीटरचे अंतर 'केपीं'नी पाच तास २६ मिनिटांत सोमावरी (ता. २६) काल पार केले.ही फत्ते मोहीम त्यांनी बुडणे प्रतिबंधक जागृतीला (Drowning Prevention Awareness)समर्पित केली.

माझ्या या साहसी पोहण्यातून भारतीय तरुण जलतरणपटूंना प्रोत्साहन मिळून देशाला ऑलिम्पिकमध्ये दहा किलोमीटर पोहण्याच्या स्पर्धेतील सुवर्णपदक मिळवून देण्यासाठी प्रयत्नांची पराकष्टा ते करतील, अशी प्रतिक्रिया कृष्णप्रकाश यांनी 'सरकारनामा'ला दिली. कुठल्या तरी एका खेळात तरुणांनी पारंगत व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. कुठलंही कर्तव्य आपण कौशल्याने तेव्हाच पार पाडू जेव्हा आपण पूर्ण तंदुरुस्त म्हणजे फीट असू,असे ते म्हणाले.

राष्ट्रीय जलतरण संस्थेच्या सौजन्याने (National Institute 0f Swimming)आणि वर्ल्ड वॉटर स्विमिंग असोसिएशनच्या मान्यतेने या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. जेडी स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष जयप्रकाश डुबले आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतरणपटू जयंत डुबले यांच्या देखरेखखाली ही मोहीम पार पडली. सूरज करकेरा यांनी या ऑलिम्पिकपटूंनी या मोहिमेला झेंडा दाखवला. तर दूसरे ऑलिम्पियन धनंजय महाडिक हे समारोपाला हजर होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT