Narendra Modi
Narendra Modi Sarkarnama
पिंपरी चिंचवड

PM Narendra Modi News: पंतप्रधान मोदींच्या 'मन की बात' कार्यक्रमाची शंभरी, पिंपरीमध्ये भाजपकडून जोरदार तयारी

सरकारनामा ब्यूरो

उत्तम कुटे

Pimpri Chinchwad : देशात २०१४ रोजी काँग्रेसचा दणदणीत पराभव करत भाजप सत्तेत आलं. या निवडणुकीत मोदींच्या करिष्यानं देशभरात भाजपला घवघवीत यश मिळालं. यानंतर पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी काही अभिनव उपक्रम राबविले. त्यात `मन की बात` या कार्यक्रमाचा समावेश आहे. हा कार्यक्रम येत्या रविवारी(दि.३०) शंभरी पूर्ण करणार आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपकडून देशभरात या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी सुरु आहे. आता पिंपरी चिंचवडमध्येही मोदींच्या मन की बात कार्यक्रमासाठी नियोजन सुरु आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) हे २०१४ पासून सातत्यानं 'मन की बात' या कार्यक्रमाद्वारे दर महिन्याच्या अंतिम रविवारी जनतेशी संवाद साधतात. येत्या रविवारी (ता.३०) शंभरीत पदार्पण करीत आहे. त्यामुळे त्याची जय्यत तयारी `अब की बार, सौ पार`अशी घोषणा पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी केलेल्या भाजपने केली आहे. देशवासियांशी थेट संवाद साधावा, त्यांच्या कल्पना, समस्या आणि मतं ऐकणं या उद्देशानं मोदींनी `मन की बात` हा कार्यक्रम सुरु केला होता.

उद्योगनगरीत तीनपैकी भाजपचे दोन आमदार (भोसरीचे महेश लांडगे आणि चिंचवडच्या अश्विनी जगताप) हे सध्या `मन की बात`च्या तयारीच्या नियोजनात व्यस्त आहे.त्यांना या कार्यक्रमाचे पश्चिम महाराष्ट्राचे संयोजक आणि भाजपचे प्रदेश सचिव अमित गोरखे यांची साथ आहे.समाजामध्ये सकारात्मकता आणि व्हालंटेरिझम ( स्वेच्छेने पुढं होऊन काही करण्याची ) भावना रुजवणारा हा कार्यक्रम असल्याची प्रतिक्रिया गोरखे यांनी यानिमित्त `सरकारनामा`ला दिली.

रेडिओला संजीवनी...

मन की बात कार्यक्रमानं रेडिओला ऑक्सिजन मिळाला. नवसंजीवनी मिळाली. त्याच्या श्रोत्यांची संख्या १२ कोटीवर गेली.दूरचित्रवाणी वाहिन्यांनीही या कार्यक्रमाला मोस्ट वॉचड् रेडिओ प्रोग्राम बनवलं. त्यात शिक्षण, आरोग्य, क्रीडा आणि संस्कृतीपासून स्वच्छता आणि लैंगिक समानता यासारख्या सामाजिक विषयांचा समावेश झाला आहे.अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा भारतात आले असता त्यांनाही या उपक्रमात सहभागी करून घेण्यात आले होते.

हा कार्यक्रम म्हणजे राजकीय व्यासपीठ बनणार म्हणून सुरुवातीला तो टीकेचा विषय झाला होता.डिसेंबर २०२१ च्या या चर्चेत `स्क्रीन टाईम` जास्तच वाढत चालल्याचं सांगत पुस्तक वाचन वाढणं गरजेचं असल्याचा सल्ला मोदींनी दिला होता.

'मन की बात'मध्ये पुण्याचा गौरव...

`मन का बात`मध्ये पुण्यातील चंद्रकांत कुलकर्णींच्या कामगिरीचा उल्लेख झाला. तर,दुसऱ्या एका भागात पुणे जिल्हयातील जुन्नर तालुक्याच्या नारायणपूरचे शेतकरी खंडू मारुती म्हात्रे यांची कृषी पदवीधर नात सोनल हिने आपल्या लग्नाला आलेल्या प्रत्येकाला 'केशर आंबा' जातीचे आंब्याचे रोपटे भेट दिल्याच्या पर्यावरण उपक्रमाची दखल घेतली गेली.`स्टार्ट अप इंडिया` मोहिमेला तसेच देशातील तरुणांमध्ये नवकल्पना आणि उद्योजकतेला चालना देणारे व्यासपीठही `मन की बात` ठरले आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT