Girish Bapat death, savarkar gaurav Yatra  Sarkarnama
पिंपरी चिंचवड

BJP Savarkar Gaurav Yatra News: खासदार गिरीश बापटांच्या निधनामुळे पिंपरीतील भाजपच्या 'सावरकर गौरव यात्रे'ला ब्रेक?

Chhatrapati Sambhajinagar Violence Case: राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा सातत्यानं अपमान करीत असल्यानं राज्यामध्ये असंतोष आणि चीड पसरली आहे.

सरकारनामा ब्यूरो

Pimpri Chinchwad News: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचा अपमान केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधींच्या निषेधार्थ भाजपनं राज्यभर ‘सावरकर गौरव यात्रा’सुरु केली आहे. मात्र, पुण्याचे पक्षाचे खासदार गिरीश बापट(Girish Bapat) यांच्या निधनानं २ एप्रिलला पिंपरी-चिंचवडमध्ये निघणारी ही यात्रा काही दिवस पुढे जाण्याची दाट शक्यता आहे.

पिंपरी चिंचवड शहर भाजप(bjp)च्या गुरुवारी(दि.३०)सायंकाळी होणाऱ्या बैठकीत वरील निर्णय होणार असल्याचं पक्षाच्या एका जबाबदार पदाधिकाऱ्यानं `सरकारनामा`ला सांगितलं. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार अवमान करणाऱ्या गांधींचा निषेध करून सावरकरांचे कार्य पुन्हा एकदा जनतेसमोर आणण्यासाठी भाजप-शिवसेना राज्यभरात ही यात्रा काढत आहे. त्याअंतर्गत ती पिंपरी, चिंचवड आणि भोसरी अशा तिन्ही विधानसभा मतदारसंघात येत्या रविवारी (ता.२) काढण्यात येणार होती.

यासंदर्भात पिंपरी-चिंचवड भाजपचे अध्यक्ष आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे म्हणाले,की स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अवमानाच्या मुद्यावरून महायुतीच्या सर्व पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी ‘आम्ही सारे सावरकर’अशी मोहीम सुरु केली आहे. त्यानुसार राज्यातील सर्व मंत्री, नेत्यांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या प्रोफाईलमध्ये ‘आम्ही सारे सावरकर’असा प्रोफाईल पिक्चर ठेवला आहे.

राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा सातत्याने अपमान करीत असल्याने राज्यामध्ये असंतोष आणि चीड पसरली आहे. त्याला वाट करून देण्यासाठी प्रत्येक तालुक्यात, जिल्ह्याच्या ठिकाणी, प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ही यात्रा काढून सावरकरांच्या त्यागाची माहिती जनतेपर्यंत पोचविली जाणार आहे,असे आमदार लांडगे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT