Sharad Pawar, Chandrasekhar Bawankule News Sarkarnama
पिंपरी चिंचवड

Chinchwad By Election : '' पवारांना असाकाही ४४० व्होल्टचा शॉक द्या,त्यांनी पुन्हा...'', बावनकुळेंचा हल्लाबोल

सरकारनामा ब्यूरो

उत्तम कुटे

Chinchwad By Election News : दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांचम स्वप्न व संकल्प पूर्ण करण्यासाठी त्यांच्या पत्नीला उमेदवारी दिल्यानं ही निवडणूक बिनविरोध करायला हवी होती. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्यासह मी स्वत आघाडीच्या नेत्यांना एकदा नाही,तर पाचवेळा विनंती केली. पण,आघाडीनं बेईमानी केली.

त्यामुळे चिंचवडकरांनो, २६ तारखेला भाजपला भरघोस मतदान करा, एवढ्या जोरानं कमळाचं बटण दाबा की, शरद पवार आणि अजित पवार यांना चारशे चाळीस व्होल्टचा करंट बसला पाहिजे. त्यातून त्यांनी चिंचवडचं पुन्हा नावच घेतलं नाही पाहिजे अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनुकळे यांनी पवारांसह आघाडीवरही हल्लाबोल केला आहे.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांच्या प्रचारार्थ पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) यांनी गुरुवारी (ता.१६)दिवसभर हा मतदारसंघ पिंजून दौरा केला.त्यात त्यांनीदिवसभरात ११ सभा घेतल्या. त्यात त्यांनी सांगवीतील सभेत चिंचवडची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची विनंती आघाडीला करूनही त्यांनी ती न केल्याबद्दल संताप व्यक्त केला.

बावनकुळे म्हणाले, अश्विनी जगताप यांच्या नशिबाची तसेच त्यांच्या भावनेची ही निवडणूक नसून ती चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे स्वप्न आणि संकल्प पूर्तीची ती आहे. सांगवीत दिवंगत आ. जगताप यांची भावकी (चुलत भाऊ) विरोधी पक्ष म्हणजे राष्ट्रवादीत आहे. हा धागा पकडून अशा काही गोंधळलेल्या भाऊ,बहीण मतदारांकडे जावा आणि त्यांना भाजपमध्ये आणा असं नेमकं सूचक आवाहन त्यांनी यावेळी केले.

भाजपचे प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील माजी गटनेते नामदेव ढाके,भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस आणि पक्षाच्या युवा वॉरिअर्सचे प्रदेश संयोजक अनुप मोरे, माजी नगरसेवक हर्षल ढोरे,राजेंद्र राजापुरे आदी सांगवीतील सभेला उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT