Ashwini Jagtap, NCP Symbol Sarkarnama
पिंपरी चिंचवड

Chinchwad By-election : चिंचवडचा उमेदवारच अजूनही ठरेना; राष्ट्रवादीतील इच्छुकांचं वाढलं टेन्शन

MVA News : भाजपकडून शक्तीप्रदर्शन, तर महाविकास आघाडीत सन्नाटा

उत्तम कुटे: सरकारनामा

MVA Candidate in Chinchwad : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी युतीने (भाजप) आपला उमेदवार जाहीर करून त्याचा प्रचारही धडाक्यात सुरु केला आहे. दुसरीकडे मात्र प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचा (राष्ट्रवादी काँग्रेस) उमेदवार अजून जाहीर झाला नाही. यामुळं या पक्षातील इच्छुकांसह शहरात पक्ष पदाधिकारी आणि महाविकास आघाडीत धाकधूक वाढल्याची दिसून येत आहे.

भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांचे उमेदवारी दाखल करण्यासाठीचे शक्तीप्रदर्शन सुरुही झाले आहे. दुसरीकडे उमेदवारच निश्चीत नसल्याने राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीत सन्नाटा पसरला आहे. त्यात उमेदवार ऐनवेळी लादण्याची (आयात करण्याची) चिंताही पदाधिकाऱ्यांना सतावत आहे. काही दिवसांपासून त्याबाबतची चर्चा सुरु आहे.

तसेच भाजपकडून अजूनही ही निवडणूक बिनविरोध करणयासाठीचे निकराचे प्रयत्न सुरुच आहेच. त्यासाठी त्यांनी कसब्यातील उमेदवार बदलून तो टिळक यांच्या कुटुंबातून देण्याची तयारी दर्शवून आघाडीला अखेरचे बिनविरोधचे आवाहन केले आहे. चिंचवडला, तर उमेदवारच निधन झालेल्या जगताप कुटुंबातून देऊन भाजपने अगोदरच 'माईंडगेम' खेळला आहे.

दरम्यान, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) आणि पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे उमेदवार दुपारी जाहीर करण्याची शक्यता राष्ट्रवादीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष अजित गव्हाणे (Ajit Gavhane) यांनी `सरकारनामा`शी बोलताना वर्तविली होती. मात्र,उशीरा जाहीर होणाऱ्या उमेदवारीचा फटका बसण्याची भीती त्यांच्या एका इच्छुकानेच बोलून दाखवली.

नुकत्याच झालेल्या विधानपरिषेदच्या निवडणुकीत भाजपने अशी तळ्यातमळ्यात भूमिका घेत उमेदवार जाहीर करण्यास विलंब केल्याने त्याचा मोठा फटका त्यांना या निवडणुकीत बसला. त्याची जाहीर कबुली या पक्षाचे रणनितीकार व `ट्रबल शूटर`नेते ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी परवाच पिंपरी-चिंचवडमध्ये (PCMC) दिली आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT