Kasaba By-Election News : चिंचवड आणि कसब्याची पोटनिवडणूक बिनविरोध करायची, असा भाजपचा मनसुभा होता. मात्र त्या कोणत्याही पक्षाने साथ दिल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळं येथे आता निवडणुका होणार आहेत. दोन्ही ठिकाणी भाजपसह महाविकास आघाडीने शक्ती प्रदर्शन उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. त्यातच आता आम आदमी पक्षाकडूनही कसबा निवडणूक लढविणार असल्याची माहिती मिळत आहे. या निवडणुकीत आता दिवसेंदिवस उमेदवार वाढत असल्याचे दिसून येत आहे.
भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasane) यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपमधला अंतर्गत वाद आणि दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांची पती शैलेश टिळक (Shailesh Tilak) यांची नाराजी समोर आली.
काँग्रेसचे उमेदवार म्हणून रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांची अपेक्षेप्रमाणे उशिरा का होईना उमेदवारी जाहीर झाली. वंचित बहुजन विकास आघाडीचा उमेदवार देखील येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यातच आता आपकडूनही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता वाढली आहे. दरम्यान आपच्या इच्छुकांच्या मुलाखतीही पार पडल्या आहेत.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी रविवारी नाशिक येथे महाविकास आघाडीबाबत स्पष्ट वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले होते की, आमची आघाडी महाविकासआघाडी सोबत अद्याप झालेली नाही. त्यामुळे शिवसेनेचा उमेदवार कसबा मतदारसंघात नसेल तर वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार उभा केला जाईल, असे आंबेडकर यांनी रविवारी स्पष्ट केलं होतं.
दरम्यान कसब्यातून काँग्रेसचा उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर वंचित उमेदवार आज किंवा उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे. यातच भर म्हणून आम आदमी पार्टीच्या वतीने पार्टीचे राज्य संघटक विजय कुंभार यांनी आज कसबा निवडणूक कार्यालयातून अर्ज घेतला आहे. उद्यापर्यंत स्वतः विजय कुंभार अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.
दरम्यान आपच्या कसबा पोटनिवडणुकीसाठी आम आदमी पक्षाकडून (AAP) सात जण इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या होत्या. या उमेदवारांमध्ये विजय कुंभार, श्रीकांत आचार्य, किरण कद्रे, आनंद अंकुश, घनशाम मारणे, सुनीता काळे, सीमा गुट्टे यांचा समावेश होता. आता त्यातील विजय कुंभार (Vijay Kumbhar) यांनी कसबा निवडणूक कार्यालयातून अर्ज घेतला आहे. उद्यापर्यंत स्वतः विजय कुंभार अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.
ब्राह्मण समाजाच्या नाराजीला वाट करून देण्यासाठी हिंदू महासंघ या नव्या व्यासपीठाच्या माध्यमातून ब्राह्मण समाजाचं प्रतिनिधित्व म्हणून आनंद दवे (Anand Dave) यांची उमेदवारी कसब्यातून दाखल होणार आहे. कसबा विधानसभा मतदारसंघाची बिनविरोध होईल असं सांगण्यात येणारी निवडणूक आता प्रचंड उत्सुकतेची झाली आहे वेगवेगळ्या पक्षाने या निवडणुकीत उडी घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याऐवजी अधिकच रंजक होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.