पिंपरीः राज्यभर २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर म्हणजे आजपर्यंत दक्षता जनजागृती सप्ताह म्हणजे भ्रष्टाचार प्रतिबंधक आठवडा साजरा केला जात आहे. मात्र,तो संपण्याच्या आतच पुणे जिल्ह्यात रविवारी (ता.३१) त्याला हरताळ फासला गेला.
मावळ (Maval) तालुक्यातील साते गावचा ग्रामपंचायत सदस्य ऋषीनाथ मारुती आगळमे (Rishinath Aagame) याला एक लाख रुपयांची लाच घेताना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले. तर, या गुन्ह्यातील मुख्य आरोपी आणि साते गावचा सरपंच संतोष पोपट शिंदे, हा मात्र फरार झाला. दिवाळीच्या तोंडावरच ही लाचखोरी घडल्याने संपूर्ण मावळ तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
साते गावात ५३ वर्षीय तक्रारदाराच्या पत्नीचे भंगार सामान खरेदी-विक्रीचे दुकान आहे. त्याविरुद्ध स्थानिक नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे तक्रार अर्ज केला होता. त्यावर सदर दुकान गावात चालू ठेवण्यासाठी आणि त्याकरिता ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला देण्यासाठी सरंपच आणि ग्रामपंचायत सदस्याने सव्वा लाख रुपये दुकानदार महिलेचा पती म्हणजे या प्रकरणातील तक्रारदारांकडे मागितले. नंतर त्यांनी एक लाख रुपयांवर तडजोड केली. मात्र, त्यांना लाच द्यायची नसल्याने त्यांनी पुणे एसीबीकडे तक्रार केली. ती खरी असल्याची खातरजमा एसीबीने २८ तारखेला केली. त्यानंतर काल त्यासाठी ट्रॅप रचला गेला. त्यात आगळमे अडकला. तर, शिंदे निसटला.
कान्हेफाटा (ता.मावळ) येथील हॉटेल शिवराज मागे आगळमेला एक लाख रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले. तो व शिंदेविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये वडगाव मावळ पोलिस ठाण्यात काल रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे एसीबीचे पोलिस निरीक्षक भारत साळूंके, सुनील क्षीरसागर, शरद गोर्डे, पोलिस शिपाई भूषण ठाकूर, रियाज शेख, दिनेश माने,अंकुश आंबेकर, सौरभ महाशब्दे, पोलिस चालक, पोलिस शिपाई माळी, दिवेकर या पथकाने ही कारवाई केली.
बारामतीत उद्या राजकीय फटाके फुटणार का?
बारामती : मुख्यमंत्र्यांसह महाविकास आघाडीचे महत्वाचे नेते मंगळवारी (ता. २) बारामतीत एकाच व्यासपीठावर येणार आहेत. ते काय बोलतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray), राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), उपमुख्यमंत्री अजित पवार हे महत्वाचे नेते एकाच व्यासपीठावर एकत्र असतील, त्यामुळे काही राजकीय फटाके फुटणार का याचीही चर्चा सुरु आहे. अँग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या इनक्युबेशन, इनोव्हेशन अँड सायंटिफिक रिसर्च इन्स्टिट्यूटच्या उदघाटनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे मंगळवारी (ता. 2) बारामतीत येत असून त्या निमित्ताने शहरात जय्यत तयारी करण्यात आली आहे. शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे देखील मुख्यमंत्र्यांसोबत पूर्ण दौ-यात असतील. पवार कुटुंबियांच्या बारामतीतील दिवाळीकडे तसेही माध्यमांचे कायमच लक्ष असते, अनेक दिग्गज दिवाळीनिमित्त शरद पवार व अजित पवारांच्या भेटीसाठी येत असतात, त्या मुळे या समारंभाकडेही सर्वांचेच लक्ष असेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.