Election Commission Sarkarnama
पिंपरी चिंचवड

Chinchwad by-Election News : चिंचवडमधून ४० जणांची उमेदवारी; शेवटच्या दिवशी तब्बल २६ अर्ज दाखल

सरकारनामा ब्युरो

Election News : चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी एकूण चाळीस उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे मंगळवारी (ता. ७) तब्बल २६ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आता अर्ज छाननी आणि अर्ज माघारीनंतर किती जणांनी उमेदवारी राहणार याकडे लक्ष लागले आहे.

चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप (MLA Laxman Jagtap) यांच्या निधनामुळे ही निवडणूक होत आहे. गेल्या महिन्यात ३ तारखेला त्यांचे निधन झाल्यानंतर लगेचच १५ दिवसांत ही निवडणूक जाहीर करण्यात आली. त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला होता. ३१ जानेवारीपासून त्यासाठी अर्ज दाखल करण्यास सुरवात झाली.

अखेरच्या दिवशी म्हणजे मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), संभाजी ब्रिगेड, आम आदमी पार्टी (AAP), शिवसेना (ठाकरे) बंडखोर (Shivsena) आणि अपक्ष अशा २६ जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यापूर्वीच्या सहा दिवसांत फक्त १४ जणांनी ते भरून दिले होते. दरम्यान एका अपक्ष उमेदवाराने अनामत रक्कम म्हणून दहा हजारांची चिल्लर जमा केली. ती मोजताना निवडणूक कार्यालयातील कर्मचाऱ्यांची धांदल उडाली होती.

उद्या दाखल अर्जांची छाननी होईल. त्यात वैध ठरलेल्या उमेदवारांनाल १० तारखेपर्यंत आपली उमेदवारी मागे घेता येणार आहे. त्यानंतर एक, दोन की तीन व्होटिंग मशिन लागतात, याचा उलगडा होणार आहे. तसेच लढतीचेही चित्र स्पष्ट होईल. तूर्तास चिंचवडची लढत ही तिरंगी होईल, अशीच चिन्हे आहेत. २६ तारखेला मतदान असून २ मार्चला निकाल लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT