Chinchwad By Poll Election : 'गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा'तील 'चिल्लर' गोंधळ चिंचवडलाही

Deposite of Candidate : उमेदवाराची अनामत रक्कम म्हणून दहा हजारांची चिल्लर; कर्मचाऱ्यांची दमछाक
Raju Kale
Raju KaleSarkarnama
Published on
Updated on

Chinchwad Election News : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी एका अपक्ष तरुण उमेदवाराने चक्क दहा हजार रुपयांची चिल्लर उमेदवारी शुल्क तथा अनामत म्हणून जमा केली. ती चिल्लर मोजता मोजता निवडणूक कर्मचाऱ्यांची आज दमछाक झाली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी वेळ संपत आली असताना हा उमेदवार चक्क साडेतेरा हजार रुपयांची चिल्लर घेऊन आला. त्यावेळी कार्यालयात मोठा गोंधळ उडाला. या घटनेने 'दिल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा' या धमाल मराठी विनोदी चित्रपटाची आठवण झाली.

'दिल्लीत गोंधळ....' सिनेमाचा नायक मकरंद अनासपुरे (Makrand Anaspure) यानेही निवडणूक लढविण्यासाठीच्या अनामत रकमेची संपूर्ण चिल्लर आणून निवडणूक कर्मचाऱ्यांची दमछाक केली होती. त्यातून घडलेले विनोद पाहून प्रेक्षकांची हसून पुरेवाट झाली होती. त्याचीच पुनरावृत्ती आज चिंचवडला (Chinchwad) झाली. Raju Kale राजू काळे (वय २८, रा. पिंपळे निलख, पिंपरी-चिंचवड) असे या अवलिया तरुण उमेदवाराचे नाव आहे. तो एमएचे शिक्षण घेत आहे. Raju Kale is student. He filed nomination form form Chinchwad constituency.

राजू काळे (Raji Kale) यांनी जमा केलेल्या उमेदवारी शुल्काच्या दहा हजार रुपयांची चिल्लर मोजायला निवडणूक कर्मचाऱ्यांना एक तास लागला. त्यात एक, पाच आणि दहा रुपयांची नाणी होती. तर, त्याच्या उमेदवारी अर्जाची प्रक्रिया पूर्ण करताना त्यांचे दोन तास गेले.

साडेबारा वाजता निवडणूक कार्यालयात गेलेला हा तरुण अर्ज भरण्याची मुदत संपायला थोडाच वेळ राहिला होता. तो दोन तासानंतर तेथून बाहेर पडला. तरीही त्याच्याकडे साडेतीन हजार रुपयांची चिल्लर शिल्लक होती. म्हणजे त्याच्याकडे असलेली साडेतेरा हजार रुपयांची एकूण चिल्लर घेऊन तो आला होता.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सरकारनामाशी राजू काळे (Raju Kale) यांनी संवाद साधला. ते म्हणाले, "बारावीत असल्यापासून ही चिल्लर जमवीत होतो. ती चिल्लर बँकही स्वीकारत नव्हती. तेवढ्यात ही पोटनिवडणूक लागली, आणि मी या चिल्लरचा उपयोग इथं करायचं ठरवलं."

रयत विद्यार्थी परिषदेचे काम केलेल्या राजू यांनी आपले डिपॉझीट जप्त होणार नसल्याचा दावा केला. उलट निर्णायकी मते घेऊ, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राजू काळे म्हणाले, "विद्यार्थी म्हणून वाढलेल्या भ्रष्टाचाराचा प्रश्न पडतो. तसेच राजकारण व निवडणूक वाईट असते, असे बोलले जाते. म्हणून त्याचा अनुभव घेण्यासाठी ही निवडणूक लढणार असून माघार घेणार नाही," असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com