Chinchwad By Election Sarkarnama
पिंपरी चिंचवड

Chinchwad By Election : राजकीय पक्षांचं ठरेना,प्रशासनाचं मात्र ठरलं; आजपासून उमेदवारी अर्ज स्वीकारणार

BJP And Mahavikas Aaghadi : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आघाडी,युतीचे उमेदवार अद्याप ठरलेले नाहीत.

सरकारनामा ब्यूरो

Pimpri Chinchwad News : चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर १५ दिवसांतच केंद्रीय निवडणूक आयोगाने ही पोटनिवडणूक १८ जानेवारीला जाहीर केली.तिची अधिसुचना आज काढली जाणार आहे. त्यामुळे शहरात आचारसंहिता लागू होणार असून तिच्या अंमजबजावणीच्या तयारीला प्रशासन लागले आहे.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आघाडी,युतीचे उमेदवार अद्याप ठरलेले नाहीत. दुसरीकडे प्रशासनाची तयारी झाली असून ते आजपासून (दि.३१)उमेदवारी अर्ज स्वीकारणार आहेत. मात्र,पहिल्या दिवशी मुख्य राजकीय पक्षांचे हे अर्ज येण्याची सुतराम शक्यता नाही.

चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या निधनानंतर १५ दिवसांतच केंद्रीय निवडणूक आयोगाने ही पोटनिवडणूक १८ जानेवारीला जाहीर केली.तिची अधिसुचना आज काढली जाणार आहे. त्यामुळे शहरात आचारसंहिता लागू होणार असून तिच्या अंमजबजावणीच्या तयारीला प्रशासन लागले आहे.

त्याचा पहिला टप्पा म्हणून शहरात विनापरवाना लावण्यात आलेले राजकीय पक्षांचे बॅनर, फलक काढून टाकले जाणार आहेत. तसे आदेश काल एका बैठकीत देण्यात आले. फ्लेक्सने विद्रूप झालेले शहर त्यामुळे पुढील महिनाभर,तरी मोकळा श्वास आता घेईल.

पिंपरी-चिंचवड महापालिका उपायुक्त सचिन ढोले यांची या पोटनिवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.आजपासून पालिकेच्या थेरगाव येथील ग प्रभाग कार्यालयात ते उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरवात करणार आहेत.७ तारखेपर्यंत ते दाखल करता येणार आहेत. ८ फेब्रुवारीला त्यांची छाननी होईल.तर, १० तारखेपर्यंत ते माघार घेण्याची मुदत आहे.२६ तारखेला मतदान असून २ मार्चला निकाल लागेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT