Bhagat Singh Koshayari: राज्यपाल कोश्यारींच्या अडचणीत वाढ; उच्च न्यायालयाची नोटीस,काय आहे कारण ?

Nagpur High Court News : राज्यपाल कोश्यारी नोटिशीला उत्तर देणार ?
Governer Bhagatsingh Koshiyari
Governer Bhagatsingh KoshiyariSarkarnama

Nagpur News : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पदमुक्त करण्याची इच्छा पंतप्रधानांकडे व्यक्त केली होती. तसेच राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनाचा उर्वरित काळ चिंतन, मननात घालवण्याचा मानस पंतप्रधानांना कळवल्याचं राज्यपालांनी राजभवनाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकातून कोश्यारी यांनी ही माहिती दिली होती.

यानंतर महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींकडून त्यांच्या या निर्णयावर उलट सुलट प्रतिक्रिया उमटल्या होत्या. मात्र, आता याचदरम्यान राज्यपाल कोश्यारी यांच्यात वाढ होण्याची शक्यता आहे.

नागपूर विद्यापीठातील अधिष्ठाता नियुक्तीचा वाद आता उच्च न्यायालयात पोहचला आहे. या नियुक्तीप्रकऱणी आता उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना नोटीस बजावण्यात आली आहे. यामुळे राज्यपालांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. याचवेळी राज्यपाल कोश्यारी यांच्यासह नागपूर विद्यापीठाच्या (Nagpur University) कुलगुरूंना देखील उच्च न्यायालयाकडून ही नोटीस पाठविण्यात आली आहे.

Governer Bhagatsingh Koshiyari
Budget Session 2023 : केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात,आज काय होणार?

नागपूर विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य मोहन वाजपेयी यांनी प्राचार्य प्रशांत कडू यांच्या नियुक्तीला आव्हान दिले आहे. यासह दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहे. यामुळे राज्यपाल कोश्यारी यांच्यासह नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूंना देखील उच्च न्यायालयाकडून ही नोटीस बजावण्यात आली आहे.आता नोटिशीला राज्यपाल कोश्यारी काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat singh Koshyari) यांनी राज्यातील सत्तासंघर्ष निर्णायक टप्प्यावर आलेला असतानाच काही दिवसांपूर्वी राज्यपाल पदावरुन पदमुक्त करण्याची इच्छा पंतप्रधानांकडे व्यक्त केली होती. या संदर्भात राजभवनाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकातून राज्यपाल कोश्यारी यांनी ही माहिती देण्यात आली होती.

यावेळी त्यांनी "महाराष्ट्रासारख्या संत, समाजसुधारक आणि शूरवीरांच्या महान भूमीचा राज्यसेवक, राज्यपाल होण्याचा बहुमान मिळणे हे माझ्याकरिता अहोभाग्य होते. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ राज्यातील जनसामान्यांकडून मिळालेले प्रेम आणि आपुलकी कधीही विसरता येणार नाही. जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करु इच्छितो अशी इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे व्यक्त केली होती.

तसेच माननीय पंतप्रधानांचा विशेष स्नेह आपणास नेहमीच लाभत आला आहे, आणि आशा आहे की या संदर्भात देखील मला त्यांचा आशीर्वाद मिळत राहील," असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या मनोगतामध्ये म्हटले असल्याचे राजभवनाने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Governer Bhagatsingh Koshiyari
Amit Thackeray : महापुरुषांबद्दल बोलायची आपली लायकी आहे का? अमित ठाकरेंचा राज्यकर्त्यांना परखड सवाल

राज्यपाल आणि वाद

भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल पदाची पदभार स्विकारल्यापासून ते आजतागायत आपल्या आक्षेपार्ह आणि वादग्रस्त भूमिकांमुळे अनेकदा अडचणीत आले आहेत. राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासूनही कोश्यारी यांच्या भूमिकांविषयी शंका घेतली जात होती. तसेच यावरुन विरोधकांकडून कोश्यारी यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीकाही करण्यात आली.

कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरील वक्तव्य, मुंबईचं गुजराती कनेक्शन जोडण्याचा प्रयत्न,सावित्रीबाईंविषयी बोलताना आक्षेपार्ह विधान, चाणक्याशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल आणि समर्थ रामदासांशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचा कोण विचारेल? यांसारखे विधानं करत अनेक वाद ओढवून घेतले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com