Pimpri- Chinchwad Latest News Sarkarnama
पिंपरी चिंचवड

Congress : पिंपरी-चिंचवड शहर,जिल्ह्याची काँग्रेस कार्यकारिणी जाहीर व्हायला तब्बल दोन वर्षे का लागली?

Pimpri-Chinchwad Congress : निम्मा कार्यकाळ संपल्यानंतर अध्यक्षांनी केली कार्यकारिणी जाहीर

उत्तम कुटे: सरकारनामा

Pimpari News : काँग्रेसच्या पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा अध्यक्षपदी डॉ. कैलास कदम यांची दोन वर्षापूर्वी 7 ऑक्टोबर 2021 रोजी नियुक्ती झाली. त्यानंतर त्यांना आपली कार्यकारिणी जाहीर करायला तब्बल दोन वर्षे लागली. प्रदेशने कार्यकारिणीला मंजुरी न दिल्याने ती दोन वर्षे रखडली होती. सोमवारी (ता.4) ती अखेर जाहीर करण्यात आली.

दरम्यान, शहरात भाजप अध्यक्ष भोसरीचे आमदार महेश लांडगे यांची मुदत संपून शंकर जगताप हे दुसरे शहराध्यक्ष यावर्षी शहराला मिळाले. त्यांनी आपली कार्यकारिणी दोन महिन्यात जाहीर केली. मात्र,काँग्रेस शहराध्यक्षांना तब्बल दोन वर्षे लागली. त्यामुळे त्याची मोठी चर्चा आहे. दरम्यान,राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर दोन्ही गटांनी आपली कार्यकारिणी काही महिन्यांत जाहीर केली.तर, काँग्रेसला मात्र त्यासाठी मोठी वाट पाहावी लागली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

प्रदेशाध्यक्ष पटोलेंनीच घेतला होता वेळ

नाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर त्यांची कार्यकारिणीही उशीरानेच जाहीर झाली.त्यानंतर त्यांनी कदम यांची नियुक्ती केली. शहर काँग्रेसचे दोन वेळचे अध्यक्ष सचिन साठे यांनी ११ नोव्हेंबर २०२० ला राजीनामा दिल्यानंतर वर्षभराने कदम यांची तेथे नेमणूक झाली. ते पुणे जिल्हा इंटकचे अध्यक्ष व राष्ट्रीय सचिव आहेत. त्यांनीही प्रदेशाध्यक्षांचा कित्ता गिरवत आपली कार्यकारिणी जाहीर करण्यास मोठा वेळ घेतला. काम करणाऱ्यास त्यात स्थान देता यावे म्हणून वेचून वेचून माणसे घेतली,त्यामुळे सर्वसमावेशक कार्यकारिणी जाहीर करण्यास उशीर झाला,असे कदम यांनी सरकारनामाला सांगितले.

७५ जणांची जंबो कार्यकारिणी

ही जंबो कार्यकारिणी ७५ जणांची असून त्यात तीन ब्लॉक अध्यक्ष, दोन वरिष्ठ उपाध्यक्ष, सतरा उपाध्यक्ष तर तब्बल सव्वीस सरचिटणीस आहेत. मनसे नंतर भाजपमधून काही महिन्यापूर्वीच काँग्रेसमध्ये आलेले भरत वाल्हेकर यांना थेट वरिष्ठ उपाध्यक्ष करण्यात आले आहे. विविध विभाग व सेलचे अध्यक्षही त्यात आहेत. ज्येष्ठ अडचणीची ठरू शकणाऱ्या अध्यक्षपदासाठी मुलाखत दिलेल्यासंह काही ज्येष्ठ मंडळींना खुबीने मार्गदर्शक बनविण्यात आले आहे. सध्या शहरात पक्षाची ताकद अगदी तोळामासा आहे. महापालिकेत, तर एक नगरसेवकही नाही. आमदार,खासदार दूरच त्यामुळे नवी कार्यकारिणी आगामी महापालिका निवडणुकीत खाते उघडणार का याकडे आता लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT