Telangana Election: रेड्डी यांना मुख्यमंत्री करण्याबाबत एकमत होईना...

Telangana Assembly News :आता काँग्रेस हायकमांड ठरवणार तेलंगणाचा मुख्यमंत्री कोण  
Telangana Chhattisgarh Assembly Results LIVE
Telangana Chhattisgarh Assembly Results LIVE Sarkarnama
Published on
Updated on

Telangana News : तेलंगणाचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार यावर नवनिर्वाचित आमदारांमध्ये एकमत न झाल्याने सोमवारी नव्या सरकारचा शपथविधी होऊ शकला नाही. मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत रेवंत यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र सोमवारी रात्री उशिरापर्यंत कॉग्रेस नेतृत्वाकडून कोणतीही घोषणा झाली नसल्याने राज्याचे प्रमुख ए. रेवंत रेड्डी यांच्या समर्थकांची निराशा झाले आहेत. त्यामुळे रेवंत रेड्डी यांच्या काही समर्थकांनी राजभवनावर मोर्चा काढला आणि त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची मागणी केली.

नाव जाहीर न झाल्यामुळे शपथविधी पुढे ढकलला

सोमवारी संध्याकाळी रेवंत रेड्डी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याच्या पार्श्वभूमीवर राजभवनात सर्व व्यवस्था करण्यात आली होती. सामान्य प्रशासन विभाग आणि प्रोटोकॉलचे अधिकारी राजभवनात पोहोचले होते. दरबार हॉलमध्ये शपथविधीसाठी सर्व व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, पक्षाकडून अधिकृत घोषणा न झाल्याने शपथविधी पुढे ढकलावा लागला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Telangana Chhattisgarh Assembly Results LIVE
Ahmednagar Political News : प्रयत्न अजित पवार गटाचे अन् बॅनर लागले भाजप, शिवसेना शिंदे गटाचे...

राजभवनातून अधिसूचना जारी

 दरम्यान राज्यपाल तमिलिसाई सुंदर राजन यांनी नवीन मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मार्ग मोकळा करण्यासाठी विधानसभा विसर्जित केली आणि नवीन विधानसभा स्थापन करण्यासाठी राजपत्र अधिसूचना जारी केली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी विकास राज आणि निवडणूक आयोगाचे सचिव अविनाश कुमार यांनी निवडून आलेल्या आमदारांची यादी राज्यपालांना सादर केल्यानंतर ही अधिसूचना जारी करण्यात आली होती.

रेवंत रेड्डी हे मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार आहेत.

रेवंत रेड्डी हे मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत.  तरी देखील ज्येष्ठ नेते मल्लू भट्टी विक्रमार्का, माजी राज्य प्रमुख उत्तम कुमार रेड्डी आणि माजी उपमुख्यमंत्री दामोदर राजनरसिंह हे इतर दावेदार देखील रेस मध्ये आहेत. 

डी.के. शिवकुमार दिल्लीला रवाना झाले

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि निरीक्षक डी.के. शिवकुमार नवनिर्वाचित आमदारांचे विचार हायकमांड पर्यंत पोहोचविण्यासाठी दिल्लीला रवाना झाले आहेत. सीएलपीच्या बैठकीनंतर इतर निरीक्षक दीपा दास मुन्शी, डॉ. अजॉय कुमार, के.जे. जॉर्ज आणि के. मुरलीधरन यांनी सर्व ६४ आमदारांची स्वतंत्रपणे भेट घेऊन त्यांचे मत जाणून घेतले आहे .  

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com