पिंपरी चिंचवड

मोठी बातमी : पोलिस दलात मोठा खांदेपालट ; निवडणुकीची तयारी सुरु

बदल्या करण्यात आलेल्यांत २२ पोलिस निरीक्षक (पीआय), १७ सहाय्यक निरीक्षक (एपीआय़) आणि ३१ उपनिरीक्षक तथा फौजदार (पीएसआय) आहेत. त्यातील बहूतांश शहरात बदलून आलेले आहेत.

सरकारनामा ब्युरो

पिंपरी : चार महिन्यांवर आलेल्या पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) महापालिका निवडणुकीसाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. तशीच ती पोलिसांकडूनही सुरु झाली आहे. निवडणूक जाहीर झाल्यावर पोलिसांच्या बदल्यांवर निर्बंध येणार आहेत. म्हणून त्यापूर्वीच पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी सत्तर अधिकाऱ्यांच्या बदल्या करीत शहर पोलिस (Police) दलात मोठा खांदेपालट आज केला. त्यातून त्यांनीही निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. तिला सामोरे जाण्यासाठी आपल्या टीम बांधणीला ते लागले आहेत.

बदल्या करण्यात आलेल्यांत २२ पोलिस निरीक्षक (पीआय), १७ सहाय्यक निरीक्षक (एपीआय़) आणि ३१ उपनिरीक्षक तथा फौजदार (पीएसआय) आहेत. त्यातील बहूतांश शहरात बदलून आलेले आहेत. त्यांना नियुक्त्या दिल्या गेल्या आहेत. त्यातून अनेक पोलिस ठाण्याना अधिकचे आवश्यक अधिकारी वर्गातील मनुष्यबळ निवडणुकीच्या तोंडावर उपलब्ध झाले आहे. काहींना साईड ब्रॅंच म्हणजे दुय्यम शाखेतून पोलिस ठाण्यांत निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी नियुक्त करण्यात आले आहे.

तक्रार आलेल्या काही अकार्यक्षम अधिकाऱ्यांची ठाण्यातून उचलबांगडी करून त्यांना दुय्यम शाखेत पाठवण्यात आले आहे. प्रशासकीय कारणास्तव निवड मंडळामार्फत १६ पीआयच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत. तर, आठ निरीक्षकांना त्यांच्या विनंतीनुसार बदलण्यात आले आहेत. पोलिस ठाण्यात निलंबन होऊन नंतर नियंत्रण कक्षाशी संलग्न करण्यात आलेल्या एका पीआयला आता पुन्हा पोलिस ठाण्यात नियुक्ती देण्यात आली आहे. काही पोलिस ठाण्यांच्या प्रमुखांचीही बदली करण्यात आली आहे. बदली झालेल्यांना तातडीने नव्या जागी रुजू होण्याचा आदेश देण्यात आला आहे. पोलिस कर्मचाऱ्यांच्या, मात्र अशा बदल्या करण्यात आल्या नाहीत. त्या दिवाळीनंतर होण्याची शक्यता आहे.

भाजपची पिंपरीत टॅब खरेदी विद्यार्थ्यांसाठी नव्हे निवडणूक फंडासाठी

पिंपरी : कोरोनाचा कहर कमी झाल्याने शाळा, महाविद्यालये सुरु झाली आहेत. परिणामी ऑनलाईनऐवजी ऑफलाईनने विद्यार्थी शिक्षणाचे धडे घेऊ लागले आहेत. तरीही भाजप (BJP) सत्ताधारी श्रीमंत पिंपरी-चिंचवड महापालिकेने शाळा सुरु झाल्यानंतर ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी सव्वा आठ हजार टॅब खरेदी करायचे ठरवले आहे. त्यातून करदात्यांच्या कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी होणार असल्याने त्याला राष्ट्रवादी कॉंग्रेस (ncp) आणि शिवसेनेने (shivsena) कडाडून विरोध करून हे टॅब खरेदी रद्द करण्याची मागणी केली आहे. आगामी पालिका निवडणुकीसाठी फंड गोळा करण्याचा यातून डाव असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. टॅब खरेदीचा निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक आणि माजी महापौर योगेश बहल यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.अन्यथा पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल. न्यायालयात धाव घेऊन आपणाविरोधात कायदेशीर कार्यवाही केली जाईल, असा इशाराही बहल यांनी आयुक्तांना दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT