मोठी बातमी : प्रभाकर साईलचा फर्जीवाडा ; 'ती' व्यक्ती सॅम डिसुझा नव्हे

ज्या सॅम डिसुझा (Sam D'Souza) या व्यक्तीला पैसे दिल्याचे सांगून त्याचा फोटो प्रभाकर साईलनं दाखविला होता. मात्र ती व्यक्ती सॅम नसल्याचे समजते.

मोठी बातमी : प्रभाकर साईलचा फर्जीवाडा ; 'ती' व्यक्ती सॅम डिसुझा नव्हे
Published on
Updated on

पालघर : क्रूझ पार्टीप्रकरणी मोठा गौप्यस्फोट करणारे पंच प्रभाकर साईल (Prabhakar Sail) यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे पोलिसांना सांगितल्यानंतर मुंबई पोलिसांना त्यांना संरक्षण दिलं आहे. याच प्रभाकर साईल यांचा नवीन फर्जीवाडा उघडकीस आला आहे. त्याच्याविरोधात एका व्यापाऱ्याने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

प्रभाकर साईल हे आर्यन प्रकरणात साक्षीदार असलेल्या किरण गोसावी यांचे खाजगी बॉडीगार्ड आहेत. प्रभाकर साईल यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, क्रुझवरील कारवाईनंतर बाहेर आल्यावर किरण गोसावीला सॅम नामक व्यक्तीचा फोन आला.

या संभाषणादरम्यान 25 कोटीची मागणी करून 18 कोटींची डील फिक्स करून त्यातील एनसीबी अधिकारी 8 कोटी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांना देऊन बाकी 10 आपण वाटून घेऊ असे संभाषण गोसावी आणि सॅम दरम्यान झाल्याचा दावा साईल यांनी केला होता.


मोठी बातमी : प्रभाकर साईलचा फर्जीवाडा ; 'ती' व्यक्ती सॅम डिसुझा नव्हे
भाजपच्या आमदारांवर आघाडी सरकारनं ओढला 'आसूड'

सॅमने माझ्या मार्फत चर्चगेट जवळील एका हॉटेल जवळ 38 लाख रुपये घेतल्याची माहिती दिली आहे. ज्या सॅम डिसुझा (Sam D'Souza) या व्यक्तीला पैसे दिल्याचे सांगून त्याचा फोटो प्रभाकर साईलनं दाखविला होता. मात्र ती व्यक्ती सॅम नसल्याचे समजते. ते छायाचित्र पालघर येथील व्यापारी हेनिक बाफना याचे आहे. प्रभाकर साईल यांनी आपल्या प्रोफाइल फोटो दुरुपयोग केल्याची तक्रार बाफना यांनी पालघर पोलिसांकडे केली आहे. या प्रकरणाशी आपला काहीही संबध नसल्याचे बाफना यांनी तक्रारीत म्हटलं आहे.

बाफना यांनी ''माझा प्रोफाइलवरील फोटो आणि माझ्या मोबाईल नंबरचा आधार घेत माझे सॅम नाव सांगून मला 38 लाख रुपये दिल्याची माहिती प्रसारित करून प्रभाकर साईल माझी बदनामी केली," असे तक्रारीमध्ये म्हटलं आहे. ''मी प्रभाकर साईलला दोन महिन्यापूर्वी व्यवसायानिमित्त भेटलो होतो. मात्र माझा त्याच्याशी कुठलाही व्यवहार झाला नाही,'' असे त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे. माझे सॅम नाव सांगून मला 38 लाख रुपये दिल्याची माहिती प्रसारित करून प्रभाकर साईल माझी बदनामी करीत असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

साईलने एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. आर्यनला सोडण्यासाठी मध्यस्थातर्फे २५ कोटी रुपयांची मागणी शाहरुख खानकडे करण्यात आली होती, असा दावाही साईलने केला आहे. वानखेडे यांनी सांगितल्यानंतर आपण पंच म्हणून कोऱ्या कागदावर सही केल्याचेही साईल यांनी सांगितले होते. आपल्या जीवाला धोका असल्याने एवढे दिवस आपण गप्प होतो, असा दावा प्रभाकर साईल यांनी केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com