Jayant Patil
Jayant Patil Sarkarnama
पिंपरी चिंचवड

By Election : देशात स्वातंत्र्यांनतर प्रथमच राजकीय पक्षाची चोरी; जयंत पाटलांचा भाजपवर हल्लाबोल

सरकारनामा ब्युरोे

NCP Campaign : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारार्थ पक्षाच्या तीन मोठ्या नेत्यांची या मतदारसंघात (रहाटणी) आज सभा झाली. त्यात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्वातंत्र्यानंतर देशात प्रथमच एका राजकीय पक्षाची (शिवसेना) चोरी झाल्याचा हल्लाबोल नाव न घेता भाजपवर केला.

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची सभा झालेल्या ठिकाणीच आज जयंत पाटील (Jayant Patil), भास्कर जाधव आणि धनजंय मुंडे (Dhananjay Munde) यांनी सभा घेतली. त्यांनी चिंचवडमध्ये स्थायिक झालेल्या मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील मतदारांना साद घातली. यावेळी त्यांनी पंढरपूर वगळता इतर पोटनिवडणुका आघाडीने जिंकल्याने चिंचवडलाही आघाडीचाच विजय होईल, असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी जयंत पाटील म्हणाले, "शिवसेना स्थापन केली त्यांच्या मुलाकडून हा पक्ष व या पक्षाचे चिन्ह काढून घेण्याचा प्रकार लोकशाही संपवण्यासारखे आहे. आज एक पक्ष संपला, उद्या चार पक्ष संपतील, याला विरोध केला नाही, तर मतांचा अधिकार तथा घटना संपायलाही वेळ लागणार नाही."

भाजपवर कडाडून टीका करताना पाटील यांनी त्यांच्याकडे राजकारणासाठी काहीही किंमत नाही, हे सांगितले. पाटील म्हणाले, "त्यांनी विधानपरिषद व राज्यसभेत आपले उमेदवार जिंकावेत म्हणून आजारी आमदार लक्ष्मण जगताप व मुक्ता टिळक यांना रुग्णवाहिकेतून मुंबईला नेले. पण, असे राजकारण नको, त्याला मर्यादा हवी. आमचं नाव घेतलं, तर तुमचाही कार्यक्रम करू, असा मेसेज बीबीसीवरील धाडीतून भाजपने देशातील न्यूज चॅनेल, वर्तमानपत्रांना दिला आहे."

चिंचवड व कसबापेठमध्ये (By Election) आपल्याला विजय हवा असेल, तर महागाई, पक्ष (शिवसेना) चोरला, बीबीसीवरील छापा हे मुद्दे घरोघरी जाऊन मतदारांना पटवून देण्याचा कानमंत्र पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला.

आपल्या बूथ आणि वॉर्डवर लक्ष देऊन ते सांभाळा. विरोधकांचा प्रभाव असलेल्या ठिकाणी सभा घ्या, सोशल मीडियावरून प्रचार करा. गॅस, पेट्रोल, डिझेल किती महागले हे लोकांना घरी जाऊन सांगा, असा सल्ला त्यांनी दिला. विरोधकांची मते विभागली जावीत म्हणून म्हणून भाजपने अपक्ष उमेदवार (कलाटे) उभा केला आहे, हे मतदारांना पटवून द्या, असेही पाटील यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT