Politics : शिंदेंच्या निशाण्यावर आता दोन्ही राऊत; लोकसभेतील अन् राज्यसभेतील गटनेतेपद घालविणार!

Thackeray vs Shinde : येत्या काळात शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्या टोकाचा राजकीय संघर्ष होण्याची शक्यता
Sanjay Raut, Eknath Shinde, vinayak raut
Sanjay Raut, Eknath Shinde, vinayak raut Sarkarnama

Shivsena : निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला बहाल केल्यानंतर राज्यातल्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याची संपूर्ण तयारी ठाकरे गटाने केली आहे.

दुसरीकडे या निकालाच्या आधारे एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना खरी असल्याच्या दाव्याला निवडणूक आयोगाने पुष्टी दिल्याने शिवसेनेची संबंधित अनेक संस्था आणि पदांवर शिवसेनेने म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्या गटाने दावा सांगण्यास सुरुवात केली आहे.

Sanjay Raut, Eknath Shinde, vinayak raut
Ashok Chavan News : माझा मेटे करा, अशा चर्चा सध्या सुरू आहेत, चव्हाणांचा खळबळजनक आरोप..

विधिमंडळातील विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद अंबादास दानवे यांच्याकडून काढण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासोबतच विधिमंडळातले शिवसेनेचे कार्यालय शिंदे यांच्या शिवसेनेने ताब्यात घेतले आहे.

दुसरीकडे शिवसेनेचे प्रवक्ते आणि राज्यसभेतील गटनेते संजय राऊत यांच्यावर गेल्या दोन दिवसात अनुक्रमे नाशिक, ठाणे आणि भोरमध्ये गुन्हे दाखल झाले आहे. यानंतर आणखी एक मोठा झटका ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांना देण्याच्या तयारीत एकनाथ शिंदे यांची शिवसेना असल्याचे सांगितले जात आहे.

Sanjay Raut, Eknath Shinde, vinayak raut
Sanjay Raut News : संजय राऊतांच्या अडचणी वाढणार : नाशिकपाठोपाठ भोर पोलिसांतही तक्रार दाखल

राज्यसभेतील शिवसेनेचे गटनेतेपद संजय राऊत यांच्याकडून काढून घेण्यात येणार असल्याचे विश्वसनीय सूत्रानी सांगितले. एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केल्यानंतर आता राज्यातील 18 पैकी तब्बल 13 खासदार एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत. उर्वरित पाच खासदारांपैकी आणखी दोन खासदारांची देखील चलबिचल सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

Sanjay Raut, Eknath Shinde, vinayak raut
Thackeray Group : पिंपरीत ठाकरे गट आक्रमक : महिला संघटक, उपशहर प्रमुखांसह आठ जणांची हकालपट्टी; 'हे' आहे कारण !

निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात केवळ चारच खासदारांचा उल्लेख आहे. त्यामुळे या सर्वांच्या आधारे शिवसेनेचे लोकसभेतील विनायक राऊत यांच्याकडील गटनेतेपद काढून राहुल शेवाळे यांना कायम केले जाणार असल्याची शक्यता सूत्रांनी 'सरकारनामा' शी बोलताना सांगितले.

Sanjay Raut, Eknath Shinde, vinayak raut
Patan : निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात पाटणला उद्धव ठाकरे गटाची निदर्शने

शिवसेनेचे नाव आणि पक्ष चिन्ह गेल्यानंतर शिंदे आणि ठाकरे गटात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. हे आरोप केवळ राजकीय नाही तर त्यात टोकाची वैयक्तिक टीका केली जात आहे. त्यामुळे येत्या काळात शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्या टोकाचा राजकीय संघर्ष होण्याची शक्यता आहे.

राज्यातच नव्हे तर देशपातळीवर भारतीय जनता पक्षाच्या विरोधात व्यापक आघाडी उघडण्याची योजना उद्धव ठाकरे यांनी आखली असून त्यासाठी त्यांची जोरदार तयारी सुरू आहे. ही तयारी सुरू असतानाच शिवसेनेला निवडणूक आयोगाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात होणारी लढाई आणि मूळ पक्ष फुटीवर सुरू असलेली सुनावणी या दोन्ही आघाड्यांवर लढावे लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com