Pimpri Vanchit
Pimpri Vanchit  Sarkarnama
पिंपरी चिंचवड

Vanchit vs Bhide Guruji : भिडे गुरुजींना विरोध करणाऱ्या 'वंचित' पदाधिकऱ्यांचा दिवस गेला पोलीस ठाण्यात

सरकारनामा ब्यूरों

Bhide Guruji : भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) यांची इंद्रायणी थडी जत्रा सध्या सुरु आहे. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष मनोहर भिडे गुरुजी (Manohar Bhide Guruji) यांनी दुपारी भोसरीतील या महोत्सवाला हजेरी लावली. पण, दुसरीकडे भिडे गुरुजींना शहरात येण्यास मज्जाव करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit) प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी सकाळपासून नजरकैदेत ठेवले.

`वंचित`चे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे (Devendra Tayade) व इतर पदाधिकाऱ्यांना शनिवारी सकाळी ११ वाजता पिंपरी पोलिसांनी (Pimpri Police) ठाण्यात बोलावून घेत बसवून ठेवले. अशा पद्धतीने भिडे गुरुजींच्या शहर प्रवेशाला विरोध केलेले वंचितचे इतर पदाधिकारी, कार्यकर्त्यांनाही शहरातील इतर काही पोलीस ठाण्यात बोलावून दिवसभर नजरकैद करण्यात आले. भिडे गुरुजींचा भोसरी (Bhosari) दौरा आटोपल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.

तायडे यांच्यासह वंचितचे शहर सरचिटणीस संजीवन कांबळे आणि भोसरी विधानसभा अध्यक्ष अनिल भारती यांनी दि. २४ जानेवारी रोजी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे (Pimpri-Chinchwad Police Commissioner) यांना पत्र लिहून भिडेगुरुजींना इंद्रायणी थडीत येण्यापासून मज्जाव करण्याची विनंती केली होती.

धर्मांध, मनुवादी आणि घटनाविरोधी तसेच संत ज्ञानेश्वर आणि तुकाराममहाराजांचा अपमान करणाऱ्या भिडेगुरुजींना येऊ दिले, तर तो वारकऱ्यांचा अपमान ठरेल, असे त्यावेळी त्यावेळी त्यांनी निवेदनात म्हटले होते.

यासह २०१८ ची भीमा कोरेगावची दंगल (Bhima Koregaon) घडविण्यातही त्यांचा हात असल्याचा आरोप वंचितच्या वतीने करण्यात आला होता. शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी त्यांना शहरात प्रवेश देऊ नये. अन्यथा, तीव्र आंदोलन करण्याचा असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला होता.

दरम्यान आज भिडे गुरुजी भोसरीत आले होते. मात्र त्यांना मज्जाव करणारे वंचितच्या पदाधिकाऱ्यांना मात्र दिवस पोलीस ठाण्यात काढावा लागला. यासाठी पोलिसांनी शहरातील वंचितचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सकाळीच पोलिसांनी ठाण्यात बोलावून घेतले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT