Chinchwad By-Election : बिनविरोधसाठी आमदार लांडगेंची विरोधी पक्षांना साद, प्रतिसाद मिळणार का?

Chinchwad By-Election : सद्सद्विवेकबुद्धीने विचार करुन जगताप कुटुंबातील उमदेवारा विरोधात लढू नये.
Chinchwad By-Election : Mahesh Landage
Chinchwad By-Election : Mahesh LandageSarkarnama

पिंपरी : आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या निधनामुळे लागलेली चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची जबाबदारी भाजप नेते आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष भोसरीचे आमदार महेश लांडगे (Mahesh Landage) यांच्यावर नुकतीच (ता.२५) सोपवली. त्यानंतर ते त्यादृष्टीने कामाला लागले, असून त्यांनी चार विरोधी पक्षांच्या शहराध्यक्षांना ही निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती आज पत्र देऊन केली.

आपण सर्वांनी जगताप कुटुंबीयांसोबत राहीले पाहिजे. म्हणून ही निवडणूक बिनविरोध करण्याबाबत पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहन आमदार लांडगे यांनी या पत्राव्दारे केले आहे. पक्षीय जोडे बाजूला ठेवून आपल्यासारख्या कार्यकर्त्याला वेळोवेळी ताकद आणि मार्गदर्शन करण्याची भूमिका दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांनी घेतली. त्यामुळे तुमच्या-माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते घडले. सर्वपक्षीय नेत्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते. हे आपल्याला विसरुन चालणार नाही.

Chinchwad By-Election : Mahesh Landage
Blog : भाजपला पोटनिवडणूक बिनविरोध का हवी, तर आघाडीला का नको?

जगतापांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष केलेल्या मार्गदर्शनाची आणि मदतीची परतफेड करण्याची ही वेळ आहे. त्यामुळे आपण सद्सद्विवेकबुद्धीने विचार करुन जगताप कुटुंबातील कोणत्याही उमदेवारा विरोधात आपला उमदेवार उभा करु नये, अशी साद त्यांनी विरोधी पक्षांना घातली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, कॉंग्रेसचे कैलास कदम, शिवसेनेचे अॅड.सचिन भोसले आणि मनसेचे सचिन चिखले या शहराध्यक्षांना त्यांनी चिंचवडची निवडणूक बिनविरोधसाठी पत्र दिले. यावेळी शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, रिपाइंचे शहराध्यक्ष स्वप्नील कांबळे, भाजपचे प्रदेश सचिव अमित गोरखे, माजी सभागृह नेते एकनाथ पवार, नामदेव ढाके, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, मोरेश्वर शेडगे, अनुप मोरे आदी उपस्थित होते.

Chinchwad By-Election : Mahesh Landage
Politics : 'चिंचवड'ची पोटनिवडणूक लाखाच्या लीडने जिंकण्याची भाजपची डरकाळी

दुसरीकडे कॉंग्रेसचे कदम यांनी चिंचवडसाठी इच्छूकांकडून कालपासून अर्ज घेण्यास सुरवात केली असून निवडणूक लढण्यावर ठाम आहे, असे त्यांनी आज सांगितले आहे.तर,राष्ट्रवादी आणि शिवसेनेनेही चिंचवड लढविण्याची घोषणा याअगोदरच केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com