Kumari Shaileja sarkarnama
राजकीय भविष्य

Political Horoscope : नशिब बलवान! कुमारी शैलेजा यांना मुख्यमंत्रि‍पदी संधी मिळणार?

Roshan More

Political Horoscope : हरियाणा विधानसभेची निवडणूक पार पडली आहे. राजकीय विश्लेषक आणि एक्झिट पोलनुसार हरियाणामध्ये काँग्रेसची सत्ता पुन्हा येताना दिसत आहे. राजकीय विश्लेषक आणि एक्झिट पोलचा अनुमान खरा ठरला तर मुख्यमंत्रि‍पदासाठी स्पर्धा पाहण्यास मिळू शकते.

भुपेंद्रसिंग हुड्डा यांना मुख्यमंत्रिपद मिळणार, अशी शक्यता वर्तवली जात असताना ज्योतिषांकडून कुमारी शैलेजा यांच्या कुंडलीत राजयोग असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे हरियाणाचा मुख्यमंत्रिपदी कुमारी शैलाजा यांना संधीची शक्यता त्यांच्या कुंडलीत असल्याचे भाकीत ज्योतिष वर्तवत आहेत.

कुमारी शैलजा या हरियाणाच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात मोठ्या दलित महिला नेत्या म्हणून परिचित आहेत. तब्बेल पाच वेळा त्या लोकसभेत विजयी झाल्या आहेत. हरियाणातील निवडणुकीदरम्यान तिकीट वाटपात वाट न मिळाल्याने कुमारी शैलजा या प्रचारापासून दूर राहिल्या होत्या. राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांच्या मध्यस्थीनंतरच शैलजा कुमारी निवडणुकीच्या प्रचारात उतरल्या.

ज्योतिष गणनेनुसार जन्मतारीख आणि सध्याच्या परिस्थितीनुसार कुमारी शैलजा यांची कुंडली इतर कोणत्याही नेत्यापेक्षा बलवान दिसते. सत्ताधारी सत्तेद्वारे जनतेची सेवा करण्याची संधी त्यांना मिळणार आहे. प्रार्थना कुंडलीतील शनिची स्थिती कुमारी शैलजा यांना राजयोग देत असल्याचे दिसते.

सहज मिळणारी नाही मुख्यमंत्रिपद

ज्योतिषांच्या मते नक्षत्रांची स्थिती तपासली तर शैलेजा यांना मुख्यमंत्रिपद मिळणे तितके सोपे नाही. अथक परिश्रम केल्यावरच त्यांना यश मिळण्याची आशा आहे. अंकशास्त्र आणि जन्मकुंडलीच्या आधारे कुमारी शैलजा यांचे ग्रह इतर कोणत्याही नेत्यापेक्षा मजबूत दिसत आहेत. त्यामुळे हायकमांडकडून शैलेजा यांचे पुढे करण्याची शक्यता देखील ज्योतिष व्यक्त करत आहेत

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT