Jammu-Kashmir Assembly Election : भाजप बहुमतापासून दूर, पण सत्तेच्या जवळ; हरियाणाची पुनरावृत्ती होणार?

BJP Politics INDIA Alliance PDP : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलमध्ये भाजप बहुमतापासून लांब असल्याचे चित्र आहे.
Jammu and Kashmir BJP
Jammu and Kashmir BJPSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : मतदान पार पडताच जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलने भाजपची चिंता वाढवली आहे. बहुतेक पोलमध्ये इंडिया आघाडीला झुकते माप देण्यात आले असले ते काठावरील आहे. मागील काही वर्षांतील निवडणुकांनंतरचा इतिहास पाहता काही राज्यांमध्ये भाजपने अशा काठावरील स्थितीत नेहमीच काँग्रेसच्या हातून सत्ता हिसकावून घेतली आहे.

‘सी वोटर’च्या एक्झिट पोलनुसार काँग्रेस व नॅशनल कॉन्फरन्स आघाडीला 90 पैकी 40 ते 48 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर भास्कर रिपोर्टर्सच्या पोलमध्ये आघाडीला 35 ते 40 जागा मिळताना दिसत आहेत. या पोलमध्ये भाजपची मजल अनुक्रमे 27 ते 32 आणि 20 ते 25 पर्यंतच जाईल, असा अंदाज आहे. माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीचा धुव्वा उडू शकतो. पीडीपीला दोन आकडी संख्या गाठणेही कठीण दिसत आहे.

Jammu and Kashmir BJP
Exit Poll : हरियाणा, जम्मू आणि काश्मीर निवडणुकीत काँग्रेसचं जोरदार कमबॅक, भाजपला धक्का; 'एक्झिट पोल'ची आकडेवारी काय सांगते ?

गोवा, मणिपूर असो की हरियाणामध्ये 2019 ची निवडणूक... या राज्यांमध्ये भाजपने सत्ता काबीज करत राजकारणात आकड्यांचे गणित जुळवणे प्रत्येकवेळी कठीण असते असे नाही. त्यामुळेच जम्मू-काश्मीरमध्येही पोलनुसार भाजप बहुमतापासून दूर राहिले तर सत्तेच्या जवळ असल्यास आघाडीला धक्का देऊ शकतो.

काय घडलं होतं हरियाणात?

2019 च्या निवडणुकीत हरियाणामध्ये भाजपला 90 पैकी 40 तर काँग्रेसला 31 जागा मिळाल्या होत्या. जेजेपीला 10 जागांवर समाधान मानावे लागले होते. कोणत्याही पक्षाला 46 चा जादूई आकडा गाठता न आल्याने राज्यात त्रिशंकू स्थिती निर्माण झाली होती. पण भाजपने निकालानंतर जेजेपी आणि अपक्षांना सोबत घेत सलग दुसऱ्यांदा सत्ता काबीज केली होती.

Jammu and Kashmir BJP
Narendra Modi : संविधान बदलाच्या नेरेटिव्हला संसदेत उत्तर? नरेंद्र मोदींचा 'मास्टर प्लॅन'

जम्मू-काश्मीरमध्ये काय होणार?

भाजपला 2014 च्या निवडणुकीत 25 जागा मिळाल्या होत्या. निकालानंतर भाजपने पीडीपीसोबत आघाडी करत सत्ता मिळवली होती. यावेळी हा आकडा वाढू शकतो. पण तो बहुमत गाठता येणार नसल्याचे एक्झिट पोलमध्ये दिसत आहे. भाजपने कोणत्याही पक्षासोबत आघाडी केलेली नाही. त्यामुळे 2014 प्रमाणे यावेळीही भाजपने सत्तेसाठी पीडीपीला जवळ केल्यास नवल वाटायला नको.

राज्यपाल नियुक्त पाच आमदारांच्या नियुक्तीचा निर्णय तातडीने घेण्यात आला आहे. त्यामुळे बहुमताचा आकडा 48 वर पोहचेल. पोलनुसार इंडिया आघाडी तिथपर्यंत पोहचू शकत नाही. अशा स्थितीत भाजपला निकालानंतर 30 च्या जवळपास जागा मिळाल्यास राज्यपालनियुक्त पाच आमदारांची त्यात भर पडेल. त्यानंतरही हा आकडा 35 वर पोहचतो. पीडीपीला 6 ते 12 जागा इतर पक्ष व अपक्षांना 6 ते 11 जागा मिळण्याची शक्यता आहे. बहुतेकवेळा छोटे पक्ष व अपक्ष सत्ताधारी पक्षाकडे ओढले जातात. तसे झाल्यास भाजप बहुमताचा आकडा गाठू शकतो.

मुफ्ती ठरणार किंगमेकर?

एक्झिट पोलनुसार, मेहबुबा मुफ्ती यांच्या पक्षाला 6 ते 12 जागा मिळू शकतात. आघाडीला पोलनुसार जागा न मिळाल्यास आणि भाजपच्या जागांमध्ये काहीशी वाढ झाल्यास मेहबुबा मुफ्ती किंगमेकर ठरू शकतात. भाजपलाही केवळ अपक्षांवर अवलंबून राहता येणार नाही. मुफ्तींना सोबत घेण्यासाठी प्रयत्न करावे लागते.

हीच स्थिती काँग्रेसचीही असेल. पण 2014 मधील सत्तेचा अनुभव पाहता मुफ्ती कितपत भाजपच्या गळाला लागणार याबाबत साशंकता आहे. त्या काँग्रेस आघाडीला पाठिंबा देण्यास मागे पुढे पाहणार नाहीत, अशी शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आता निकालानंतर भाजपला किती जागा मिळणार, यावरच जम्मू-काश्मीरमधील नव्या सरकारचे भवितव्य ठरेल, हे निश्चित.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com