सिद्धेश्वर मारटकर
सप्ताहात मंगळ-शनी नवपंचम योग होत अजून. मंगळ-गुरू शुभयोगही होत आहे. सप्ताहातील ग्रहस्थितीचा विचार करता शनी- मंगळ शुभयोगामुळे काही देशांतील युद्धामध्ये शस्त्रसंधीची घोषणा होईल. दोन देशांतील कटुता कमी होऊन शांतता प्रस्थापित करण्यात यश मिळेल. मोठ्या देशांतील व्यापार युद्धावर तोडगा निघेल. घसरलेल्या रुपयाचे मूल्य वाढेल. देशाच्या आर्थिक स्थितीत सुधारणा दिसेल. शेअर निर्देशांकात मोठी वाढ होईल. सोन्या-चांदीच्या दरातील वाढ आणखी काही दिवस कायम राहील.
शनी-मंगळ शुभयोगामुळे मोठे दहशतवादी, नक्षलवादी, माओवादी यांना पकडण्यात पोलिस, लष्कराला यश मिळेल. मोठ्या गुन्हेगारांवर कडक कारवाई होईल. टोळीयुद्ध संपविले जातील.
शनी-मंगळ शुभ योगामुळे नोकरदार वर्गाला मोठा दिलासा मिळेल. नोकरकपातीची भीती कमी होईल. परदेशी नोकरदार वर्गात नोकरीची हमी मिळेल. परंतु याबरोबर मंगळ-हर्षल प्रतियोग होत असल्यामुळे या काळात मोठ्या दुर्घटनेमध्ये मोठी हानी संभवते. काही प्रदेशांत भूकंप किंवा वादळे यांसारख्या आपत्तीतून हानी संभवते. तर काही देशांना दहशतवादी कारवाया, स्फोटक घटना, हिंसाचार, जाळपोळ, बंड यांचा धोका संभवतो.
चंद्र-प्लुटो योगामुळे या काळात मोठ्या पदांवरील व्यक्ती, राजकीय नेते, उद्योगपती यांच्या मृत्यूच्या घटना संभवतात. काही देशांत राष्ट्रप्रमुखांविरुद्ध मोठे बंड, निदर्शने होतील. या जोडीला दशमात शनी-नेपच्यून योग होत असल्यामुळे मोठ्या व्यक्तींवर भ्रष्टाचाराचे आरोप होतील. या काळात मोठ्या व्यक्तीच्या आत्महत्या किंवा गूढ मृत्यूच्या घटना संभवतात. राजकीय क्षेत्रात या काळात मोठ्या अनपेक्षित किंवा नाट्यमय घटना संभवतात. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठे आरोप-प्रत्यारोप होतील. नेत्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे तणाव निर्माण होईल. सरकारी अधिकारी किंवा मोठे नेते भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यांत अडकतील. मोठ्या व्यक्तीच्या घरावर छापे पडतील.
निवडणूक आयोगाविरोधात विरोधी पक्ष आणखी आक्रमक होऊन आयोग व सत्ताधारी पक्षांवर मोठे आरोप करतील. मात्र, कायदेशीर प्रक्रियेत सत्ताधारी पक्षाच्या बाजूने निर्णय होतील. याविरोधात विरोधी पक्षांकडून मोठी निदर्शने होतील. या काळात मोठ्या पदावरील व्यक्तींचे राजीनामे होऊन नवीन व्यक्तींची मोठ्या पदावर नियुक्ती होईल.
कलाकारांचे मानसन्मान, पुरस्कार, गौरव होतील. स्त्री वर्गाला मोठा मानसन्मान, मोठ्या पदावर संधी मिळेल. मात्र, लेखक, साहित्यिकांसाठी हा काळ प्रतिकूल राहील. मोठ्या लेखक, साहित्यिकांच्या मृत्यूच्या घटना या काळात संभवतात. या काळात काही ठिकाणी परतीचा पाऊस होण्याची शक्यता असून, थंडीची सुरुवात होईल. हवेत धुके किंवा ढगाळ वातावरण राहील. या काळात विमानसेवा विस्कळित होण्याची शक्यता असून, खराब हवामान किंवा अफवांमुळे विमानसेवा रद्द होतील. विमान प्रवासाच्या दरात मोठी वाढ होईल.
रवी-हर्षल षडाष्टक योगामुळे या काळात राजकीय क्षेत्रात अनपेक्षित बदल होतील. निवडणुका झाल्यास सत्ताधारी पक्षाचे पारडे जड राहील. काही राज्यांतील नेतृत्वात बदल होण्याची शक्यता असून, केंद्र व राज्यातील मंत्रिमंडळामध्ये अनपेक्षितपणे मोठे बदल होण्याची शक्यता राहील. नवीन नेतृत्वाला मोठ्या पदांवर काम करण्याची संधी मिळेल.
सरकारी अधिकारी-पोलिस अधिकारी यांच्या बदल्या या काळात होतील. सत्ताधारी पक्षात मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू राहील. मोठ्या नेत्यांचे पक्षांतर होतील. पक्ष संघटनेत मोठे बदल होतील. पक्षाध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष बदलले जातील. जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकींची घोषणा होईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.