Ashok Khemka File Photo
प्रशासन

29 वर्षांत 54 बदल्या झाल्याने आयएस अधिकारी वैतागला अन् म्हणाला...

नियमांवर बोट ठेवून स्वच्छ कारभार करणाऱ्या सनदी अधिकाऱ्यांना सतत होणाऱ्या बदल्यांमुऴे आपली बॅग नेहमी भरून ठेवावी लागते.

सरकारनामा ब्युरो

चंडीगड : नियमांवर बोट ठेवून स्वच्छ कारभार करणाऱ्या सनदी अधिकाऱ्यांना (IAS) सतत होणाऱ्या बदल्यांमुऴे आपली बॅग नेहमी भरून ठेवावी लागते. हरियानामध्ये (Haryana) अशोक खेमका (Ashok Khemka) यांना सारखे बदलीला सामोरे जावे लागत आहे. त्यांच्या बदल्यांचा आता रेकॉर्ड झाला असून, 29 वर्षांच्या कारकिर्दीत आता 54 वी बदली झाली आहे. यावरुन त्यांनी केंद्रासह राज्यातील भाजप सरकारला धारेवर धरले आहे.

रॉबर्ट वद्रा यांचा जमीन व्यवहार रद्द केल्यामुळे 2012 मध्ये प्रसिद्धीच्या झोतात आलेले आयएएस अधिकारी अशोक खेमका यांचे आता भाजप सरकारशीही संघर्ष सुरू आहे. या संघर्षातूनच त्यांची आतापर्यंतच्या 29 वर्षांच्या कारकिर्दीतील 54 वी बदली झाली आहे. हरियानाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याशी त्यांचे वारंवार खटके उडत आहेत. अरवली भागातील जमिनीच्या व्यवहाराबाबत अशोक खेमका यांनी पारित केलेल्या आदेशावर सरकार नाराज होते.

यावर खेमका यांनी भूमिका मांडली आहे. त्यांनी हरियानातील भाजप सरकारसोबत केंद्र सरकारवरही निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले आहे की, एका नगण्य नियुक्तीनंतर आता दुसरी नियुक्ती मिळाली आहे. सनदी सेवा मंडळाच्या शिफारशीशिवाय हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्राने बनवलेले कायदे राज्य सरकार मानत नाही. केंद्र सरकार यावर गप्प बसणार असेल, त्यामुळे कुणाचे नुकसान होईल?

खेमका यांची विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्यामध्ये तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. याआधी 1 वर्ष 11 महिन्यानंतर त्यांची बदली झाली आहे. त्यांच्याकडे आधी पुरातत्व आणि संग्रहायल विभागाचे प्रधान सचिव म्हणून जबाबदारी होती. खेमका यांच्या बदलीचे कोणतेही कारण राज्य सरकारने दिलेले नाही. डोंगराळ भागांचे संरक्षण करण्याबाबत खेमका हे सातत्याने आवाज उठवत असल्याने त्यांची बदली करण्यात आल्याचे समजते.

अशोक खेमका 1991 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. ते आधी युवक आणि क्रीडा खात्याचे प्रधान सचिवही होते. त्यावेळी क्रीडामंत्री अनिल विज यांनी अशोक खेमका यांच्या सेवापुस्तिकेत ते मेहनती आणि प्रामाणिक अधिकारी असल्याची नोंद केली होती. तसेच त्यांच्या सेवा पुस्तिकेतही फार चांगले लिहिलेले होते. परंतु मुख्यमंत्र्यांना हा अभिप्राय मान्य नव्हता. मुख्यमंत्र्यांनी अशोक खेमका यांच्या सेवा पुस्तिकेत क्रीडामंत्र्यांनी दिलेले गुण आपल्या अधिकारात कमी केले होते. त्याविरुद्ध अशोक खेमका न्यायालयात गेलेले आहेत.

कॉंग्रेसच्या राजवटीतही अशोक खेमका यांची 22 वेळा बदली झाली होती. खेमका ज्या खात्यात बदलून जातात तेथील भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार उघडकीस आणतात. समाजकल्याण विभागात त्यांनी पेंशन घोटाळा उघडकीस आणला होता. बियाणे महामंडळातही त्यांनी भ्रष्टाचार उजेडात आणला होता. 2012 मध्ये केंद्रात आणि हरियानात कॉंग्रेसचे सरकार होते. त्यावेळी गुरगाव भागात रॉबर्ट वद्रा यांनी डीएलएफ कंपनीशी केलेल्या जमीन व्यवहार रद्द केला होता. त्यावरून मोठी खळबळ उडाली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT