अम्मांच्या जागी चिन्नम्मा? अण्णाद्रमुकच्या नेतृत्वाला शशिकला देणार मोठा धक्का

व्ही.के.शशिकला यांनी राजकारणासह सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेतली होती. परंतु, शशिकलांनी आता कमबॅक केले आहे.
V.K.Sasikala and Jayalalithaa
V.K.Sasikala and JayalalithaaFile Photo
Published on
Updated on

चेन्नई : तमिळनाडूच्या (Tamil Nadu) माजी मुख्यमंत्री जयललिला (Jayalalithaa) यांच्या निकटवर्ती सहकारी व्ही.के.शशिकला (V.K.Sasikala) यांनी राजकारणासह सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेतली होती. शशिकलांनी आता जोरदार कमबॅक केले आहे. अण्णाद्रमुकच्या (AIADMK) सुवर्णमहोत्सवानिमित्त त्यांनी स्वत:ला पक्षाचे सरचिटणीस घोषित केले आहे. आता राज्यभरात यात्रा काढून पक्ष ताब्यात घेण्याची मोहीम सुरू करुन त्या पक्ष नेतृत्वाला मोठा धक्का देणार आहेत.

जयललितांना पक्ष कार्यकर्ते अम्मा तर शशिकलांनी चिन्नम्मा असे संबोधत. जयललितांच्या मागे शशिकला या कायम सावलीसारख्या असत. जयललितांच्या निधनानंतर शशिकलांनी पक्षासह सरकार ताब्यात घेतले होते. परंतु, त्यांना बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात शिक्षा भोगण्यासाठी तुरूंगात जावे लागल्यानंतर त्यांच्या हातातून पक्ष आणि सरकार निसटले होते. शशिकलांनी जोरदार कमबॅक केल्यानंतर आता तळागाळात काम करणाऱ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत पोचण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. यासाठी त्या राज्यभरात यात्रा काढणार आहेत. गटातटात विखुरलेला अण्णाद्रमुक पक्ष आपल्या नेतृत्वाखाली एकत्र आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

प्रत्येक जिल्ह्यात जाऊन त्या पदाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष संवाद साधणार आहेत. कोरोनाविषयक नियमांमुळे जाहीर सभांना परवानगी नसल्याने त्या भेटीगाठींवर भर देणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यासाठी अनेक जिल्ह्यांत तयारी सुरू झाली आहे. अनेक ठिकाणी जिल्हा प्रशासनाकडे त्यांच्या यात्रेसाठी परवानगी मागण्यात आली आहे. त्यांची ही यात्रा ३० ऑक्टोबरपासून सुरू आहे. शशिकला या पक्षांच्या नेत्यांना थेट आव्हान देत आहेत. याचवेळी आपल्या मागे पक्षाचे किती पदाधिकारी आहेत, याची चाचपणी करण्यासाठी त्यांची ही यात्रा आहे. विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाचे नेते आणि पदाधिकारी निराश झाले आहेत. नेमकी हीच वेळी साधून शशिकलांनी पुन्हा पक्ष ताब्यात घेण्याची मोहीम सुरू केली आहे.

V.K.Sasikala and Jayalalithaa
तुरुंगातील मुक्काम मंत्रिपुत्राला महागात; तातडीनं सरकारी रुग्णालयात हलवलं

पक्षाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त त्यांनी 17 ऑक्टोबरला पक्षाचे संस्थापक व माजी मुख्यमंत्री एम.जी.रामचंद्रन यांच्या स्मारकाच्या ठिकाणी पक्षाचा ध्वज फडकावला. तेथे एका कोनशिलेचे अनावरणही शशिकलांनी केले असून, त्यावर त्यांचा उल्लेख पक्षाच्या सरचिटणीस असा करण्यात आला आहे. यातून त्यांनी माजी मुख्यमंत्री ओ.पनीरसेल्वम आणि के.पलानीस्वामी या दोन्ही गटांना इशारा दिल्याचे मानले जात आहे. जयललिता या पुन्हा एकदा पक्ष ताब्यात घेण्याच्या दिशेने पावले टाकत आहेत. त्यांना पक्षातून मिळणारा पाठिंबा वाढू लागला आहे. यातच त्यांनी एकप्रकारे शक्तिप्रदर्शन करीत कमबॅकचे संकेत दिले आहेत.

V.K.Sasikala and Jayalalithaa
शशिकला पुन्हा अडचणीत! आता पक्षानेच घेतली पोलिसांकडे धाव

विशेष म्हणजे अण्णाद्रमुक पक्षाचा सुवर्णमहोत्सव साजरा होण्याच्या एक दिवस आधी 16 ऑक्टोबरलला अण्णाद्रमुकचा ध्वज लावलेल्या मोटारीतून शशिकला या मरिना बीचवर पोचल्या होत्या. त्यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले होते. त्यांना जयललितांसोबत माजी मुख्यमंत्री एम.जी.रामचंद्रमन आणि अण्णादुराई यांच्या स्मारकालाही भेट देऊन आदरांजली वाहिली. त्यावेळी मोठ्या प्रमाणात अण्णाद्रमुकचे कार्यकर्ते उपस्थित होते. शशिकला या पुन्हा राजकारणात सक्रिय होत असल्याचे संकेत त्यांना दिले होते, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. शशिकला यांनी 3 मार्चला राजकारणातून निवृत्ती घेतली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com