election commissions  sarkarnama
प्रशासन

Central Election Commission : निवडणूक आयोगाची पहिली यादी जाहीर; निरीक्षक म्हणून महाराष्ट्रातून ८० सनदी अधिकारी!

Assembly Elections : अधिकाऱ्यांना २५ दिवस संबंधित मतदारसंघातच तळ ठोकून आपली जबाबदारी पार पाडावी लागणार आहे.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : पाच राज्यांतील निवडणुकीसाठी जोरदार राजकीय तयारी सुरू आहे. निवडणूक आयोगही यासाठी कामाला लागला आहे. वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती केली असून, पाच नोव्हेंबरपासून हे अधिकारी आपल्या कामाच्या ठिकाणी रुजू होणार आहेत. महाराष्ट्रातील ८० निवडणूक अधिकाऱ्यांची पहिली यादी केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. हे अधिकारी लवकरच नियुक्तीच्या ठिकाणी जाणार आहेत.

महाराष्ट्रातील अनेक नेते पाच राज्यांतील निवडणूक प्रचारात उतरणार आहेत, तर दुसरीकडे राज्यातील प्रशासकीय अधिकारीही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत, काही अधिकारी हे कारणे सांगून जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न करीत आहेत. निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती मिळालेल्या अधिकाऱ्यांना २५ दिवस संबंधित मतदारसंघातच तळ ठोकून आपली जबाबदारी पार पाडावी लागणार आहे.

त्यामुळे महाराष्ट्रातील प्रशासकीय पातळीवरील अनेक कामांवर त्यांचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपल्याकडील विभागाची जबाबदारी सांभाळून त्यांना ही निवडणुकीची ही अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्यावर ताण येण्याची शक्यता आहे. खात्यातील काम रेंगाळण्याची शक्यता आहे.

निवडणूक अधिकाऱ्यांची पहिली यादी

अश्विनी भिडे, राधिका रस्तोगी, के. एच. गोविंदराज, आशिष शर्मा, निरंजन सुधांशू, अभिषेक कृष्णा, विजय सूर्यवंशी, अमित सैनी, अनिल भंडारी, मनोजकुमार सूर्यवंशी, सूरज मांढरे, संजय कोलते, रुबल अग्रवाल, नितीन पाटील, पी. शिवशंकर, किसन जावळे, प्रवीण पुरी, प्रदीपकुमार डांगे, शंतनू गोयल, दीपक सिंघल, कुमार खेमणार, कान्हूराजे बगाडे, निधी चौधरी, प्रताप जाधव, नीलेश गटणे, राजेंद्र भारुड, दीपक कुमार, कैलास शिंदे, दीपक तावरे, भगवंतराव पाटील, अजित कुंभार, लीना बनसोड, एच एस वसेकर आणि मंगेश गोंदावले, गणेश पाटील, नयना गुंडे, प्रशांत नारनवरे, विमल आर. माणिक गुरसाल, किरण कुलकर्णी, विवेक भीमानवर, अविनाश ढाकणे, अशोक काकडे, चंद्रकांत डांगे, कैलास पगारे, मिलिंद बोरीकर, अभिजित चौधरी, आदींचा यात समावेश आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT