Rohit Pawar : दिल्लीत हीच चर्चा केली का? 'मी पुन्हा येईन'वरून रोहित पवार फडणवीसांवर संतापले...

Maharashtra Politics : राजकारणावरून लोकांचा विश्वास उडत चालला आहे, अशी खंत रोहित पवारांनी व्यक्त केली.
Rohit Pawar, Devendra Fadnavis
Rohit Pawar, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : भाजप महाराष्ट्रच्या अधिकृत X हँडलवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 'मी पुन्हा येईन' हे वाक्य असलेला व्हिडिओ टि्वट करण्यात आल्याने राज्यातील राजकारणात गोंधळ निर्माण झाला. या गोंधळाच्या एका तासानंतर भाजप महाराष्ट्राने ते टि्वट डिलीट केले आहे. परंतु या टि्वटमधून कुणाला काय संदेश द्यायचा होता, तो साध्य झाला का? अशी चर्चा यानिमित्ताने राजकीय वर्तुळात रंगत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांनी या टि्वटवरून फडणवीसांना सुनावलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"त्यांना सगळ्याच गोष्टीत राजकारण दिसते, मी पुन्हा येईल, असे म्हणताना त्यांना पुन्हा मुख्यमंत्रिपदाची स्वप्नं पडत आहेत. महाराष्ट्र आज पेटलाय, समुद्ध महाराष्ट्राचे दिवस पुन्हा आणायला पाहिजेत, असे न बघता त्यांना पदाचे पडले आहे. दिल्लीत जाऊन तुम्ही मुख्यमंत्रिपदाची हीच चर्चा केली का? राज्यात मराठा, धनगर आरक्षणाचा मु्द्दा पेटला असताना तुम्ही या विषयाची चर्चा दिल्लीत करीत नाही का? असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला आहे.

Rohit Pawar, Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : सत्तेत असतानाही दुजाभाव; पदाधिकाऱ्याचा रोख शिंदे गटाकडे, थेट फडणवीसांकडे तक्रार

दिल्लीत जाऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिपद याचीच चर्चा करतात का? तुम्ही मंत्रिपद खेळत राहा लोकच तुम्हाला तुमची जागा दाखवतील, अशा शब्दांत रोहित पवारांनी फडणवीसांना इशारा दिला आहे. आज राजकारण खालच्या पातळीवर जात आहे, राजकारणावरून लोकांचा विश्वास उडत चालला आहे, अशी खंत रोहित पवारांनी व्यक्त केली. ते माध्यमांशी बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी शिर्डी दौऱ्यावर होते. तिन्ही पक्षांचे नेते तेथे हजर होते. मोदींचा दौरा संपत नाही तोच काल भाजप महाराष्ट्रने देवेंद्र फडणवीस यांच्या मी पुन्हा येईनचा व्हिडिओ व्हायरल केला होता. या व्हिडिओमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. शिंदेंच्या शिवसेनेतील मंत्र्यांनी प्रसारमाध्यमांपुढे येत त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. या सगळ्या गोंधळानंतर भाजप महाराष्ट्रने ते टि्वट डिलीट केले आहे. सोशल मीडियातही या व्हिडिओवरून उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.

Rohit Pawar, Devendra Fadnavis
Babanrao Dhakane : विधिमंडळाच्या सभागृहात उडी मारणारे बबनराव ढाकणे; पाथर्डीकरांसाठी ऑर्थर रोड तुरुंगात...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com