New Delihi News : देशभरात अंमलबजावणी संचालनालयाकडून गेल्या काही दिवसापासून करण्यात येत असलेल्या कारवाईमुळे घोटाळेबाजाचे धाबे दणाणले आहेत. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय ) ईडीच्या एका बड्या अधिकाऱ्याला 20 लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. ईडीचे सहाय्यक संचालक संदीप सिंग यादव यांना एका ज्वेलर्सकडून लाच घेतल्याने अटक केली.
या प्रकरणी ईडीच्या (ED)अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 3 ऑगस्टला मुंबईतील एका ज्वेलर्सची झडती घेतली होती. यावेळी ईडीचे सहाय्यक संचालक संदीप सिंग यांनी ज्वेलर्सच्या मुलाला 25 लाख रुपये दिले नाहीत तर अटक करण्याची धमकी दिली होती.
तडजोडीनंतर ही रक्कम 20 लाख रुपये ठरली. या प्रकरणी लाच घेताना ईडीचे सहाय्यक संचालक संदीप सिंग यादव यांना सीबीआयने ताब्यात घेतले. सीबीआयाने दिलेल्या माहितीनुसार सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्समध्ये यादव यांनी काम केले होते. त्यानंतर गेल्यावर्षी मे मध्ये ते ईडीचे सहाय्यक संचालक झाले होते.
यादवला गुरुवारी दिल्लीतील लाजपतनगर येथून लाच घेताना सीबीआयच्य अधिकाऱ्यांनी सापळा रचून अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुंबईतील एका ज्वेलर्सने याप्रकरणी सीबीआयकडे तक्रार केली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. सीबीआय लवकरच आरोपी ईडीचे अधिकारी यादवला न्यायालयात हजर करणार असल्याचे समजते.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.