Ahmednagar News  Sarkarnama
प्रशासन

Ahmednagar Fodder News: अहमदनगर जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय; पुढील दोन महिने जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीवर निर्बंध

Administration Restrictions on Fodder Export: जिल्ह्यात लहान-मोठे असे एकूण ३० लाख ७९ हजार ४६१ पशुधन आहे.

सरकारनामा ब्यूरो

राजेंद्र त्रिमुखे -

Ahmednagar : राज्यातील काही भागात धो-धो पाऊस पडत असताना आणि अनेक जिल्ह्यांत रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट असताना नगर जिल्ह्यावर मात्र अजून पर्जन्यराजा काहीसा रुसला आहे. अकोले तालुक्यातील सह्याद्रीच्या पट्ट्यात पाऊस बरसत असून भंडारदरा, मुळा पाणलोट क्षेत्रात पाऊस वगळता उर्वरित संपूर्ण नगर जिल्ह्यात मात्र अगदी किरकोळ स्वरूपाचा मान्सून बरसल्याने नजीकच्या काळात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याच्या शक्यतेने जिल्हा प्रशासनाने पुढील दोन महिने जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीवर निर्बंध आणले आहेत.

याबाबत जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ(Siddharam Salimath) यांनी आज(26 जुलै) काढलेल्या आदेशात, भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार दक्षिण पॅसिफिक महासागरातील अल-निनो या समुद्र प्रवाहाच्या सक्रियतेमुळे देशातील मान्सून पर्जन्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. सद्य:स्थितीत अहमदनगर(Ahmednagar) जिल्हयात सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाल्याने कालावधीत जनावरांसाठी चाऱ्याची टंचाई परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे असे कळवले आहे.

जिल्हयात मागील वर्षीच्या पेरणी अहवालानुसार 1 एप्रिल 2023 पासून 30 लाख 41हजार 022 में टन चारा शिल्लक असून तो अंदाजे 3.8 महिने पुरेल. चाऱ्याची उपलब्धता पाहता भविष्यात टंचाई भासण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्हा दंडाधिकारी सिध्दराम सालीमठ यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करत अहमदनगर जिल्हयात उत्पादित होणारा चारा, मुरघास आणि टोटल मिक्स रेशन (टीएमआर) यांची इतर जिल्ह्यात वाहतुक करण्यास मनाई आदेश जारी केला असून हा आदेश पुढील दोन महिन्यांच्या कालावधीकरिता लागू राहणार असल्याचे सांगितले आहे.(Latest Marathi News )

जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाच्या नोंदीनुसार

जिल्ह्यात लहान-मोठे असे एकूण ३० लाख ७९ हजार ४६१ पशुधन आहे. त्यांना प्रतिमहिना ७ लाख ९० हजार ९०२ मे. टन चाऱ्याची आवश्यकता भासते. मागील वर्षी जिल्ह्यात ७६ लाख १३ हजार ९२० मे. टन चारा उत्पादन झाले. मार्चअखेर ४५ लाख ७२ हजार ८९८ मे. टन चारा वापरात आला.

एप्रिल महिन्यात ३० लाख ४१ हजार २२ मे. टन चारा शिल्लक होता. मात्र जुलै महिना संपत असताना सरासरी पेक्षा निम्याने कमी पाऊस झाल्याने संभाव्य चारा टंचाई लक्षात घेऊन जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीस पुढील दोन महिन्यां करिता बंदी घालण्यात आली आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT