Neelam Gorhe and Bhai Jagtap
Neelam Gorhe and Bhai JagtapSarkarnama

Monsoon Session: नीलम गोऱ्हे अन् भाई जगतापांमध्ये रंगला कलगीतुरा; फडणवीसांनाही हसू आवरले नाही

Neelam Gorhe and Bhai Jagtap : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून सत्ताधारी आणि विरोधक अनेकदा सभागृहात आमनेसामने येतात.
Published on

Mumbai News: राज्याच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून सत्ताधारी आणि विरोधक अनेकदा सभागृहात आमनेसामने येतात. आज विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आणि आमदार भाई जगताप यांच्यात विधानपरिषदेत चांगलाच कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळाले.

विधानपरिषदेत बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवर ३००० मनुष्यबळांच्या सेवा महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून बाह्य यंत्रणेव्दारे घेण्याच्या शासन निर्णयावर आमदार भाई जगताप बोलत होते. मात्र, याच वेळी उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी जास्त वेळ बोलण्यास नाकारत रिंग वाजवली.

यानंतर भाई जगतापांनी गेल्या काही दिवसात आपल्यामध्ये झालेला बदल हा डोळ्यावर येण्यासारखा आहे, असा टोला लगावला. यावेळी गोऱ्हे यांनीही ऐकून घेतेय म्हणून आम्हाला कमजोर समजू नका, असे जगतापांना सुनावले. त्यामुळे विधानपरिषदेत आज नीलम गोऱ्हे आणि आमदार भाई जगताप यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगलेला दिसला.

Neelam Gorhe and Bhai Jagtap
BJP-Shivsena News: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा भाजप लढवणार? तयारीही जोरात; तर शिंदेंच्या शिवसेनेत शांतता

भाई जगताप यांच्या बोलण्यात अडथळा आणल्याने उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यावर ते काहीसे नाराज झाले. यानंतर त्यांनी उपसभापती गोऱ्हे यांना टोमणा मारत आपल्यात झालेला बदल हा अनाकलनीय आहे, हा योग्य नाही, असे म्हणत उपसभापती गोऱ्हे यांनी काही दिवसांपूर्वीच शिंदेंच्या शिवसेनेत केलेल्या प्रवेशावर अप्रत्यक्ष टोला लगावला.

Neelam Gorhe and Bhai Jagtap
Chhatrapati Shivaji Maharaj news : आता शासकीय पत्रांवर आणि कार्यालयांत असणार शिवराज्याभिषेक सोहळ्याचे बोधचिन्ह !

पण यामुळे गोऱ्हे यांना राग अनावर झाला. यानंतर गोऱ्हे यांनी थेट भाई जगतापांना सुनावत "मी नियमाप्रमाणे काम करते, ऐकून घेतेय, म्हणून कमजोर समजू नका. माझ्यात काहीही बदल झाला नाही", असं म्हणत प्रत्युत्तर दिलं. यावर पुन्हा भाई जगतापांनीही मी ही काही कमी नाही, असा पलटवार केला. हा सर्व प्रकार उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोरच झाल्यामुळे त्यांनाही हसू आवरले नाही.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com