Construction activity at the BKC bullet train station site, where Mumbai Municipal Corporation halted work after detecting air pollution norm violations and excessive dust emissions. Sarkarnama
प्रशासन

Mumbai–Ahmedabad Bullet Train : ऐन निवडणुकीपूर्वी महापालिकेचा दणका! मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन स्टेशनचं काम बंद पाडलं

BMC Action on Mumbai Air Pollution : एकीकडे मुंबई महापालिकेची सत्ता आपल्या ताब्यात यावी यासाठी राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. मात्र, दुसरीकडे याच मुंबईतील वायू प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस वाढत असून यावर मुंबई महापालिका काहीच उपाययोजना करत नसल्याने उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला सुनावलं होतं.

Jagdish Patil

Mumbai News, 25 Dec : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील वांद्रे-कुर्ला संकुल (BKC) येथील स्टेशनच्या बांधकामात वायू प्रदूषण नियंत्रण नियमांचे उल्लंघन केल्यामुळे मुंबई महापालिकेने संबंधित काम तात्काळ बंद करण्याची नोटीस बजावत थांबवलं आहे.

एकीकडे मुंबई महापालिकेची सत्ता आपल्या ताब्यात यावी यासाठी राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. मात्र, दुसरीकडे याच मुंबईतील वायू प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस वाढत असून यावर मुंबई महापालिका काहीच उपाययोजना करत नसल्याचं समोर आलं आहे.

कारण मुंबईतील वायू प्रदूषणाच्या समस्या गांभीर्याने न घेता त्याकडे काणाडोळा केल्याबद्दल उच्च न्यायालयाने बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी मुंबई महापालिकेला सुनावलं. प्रदूषणाची समस्या अनेक वर्षांपासून मुंबईला भेडसावत असताना प्रदूषण कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याऐवजी मुंबईसारख्या शहरात एक हजार कोटींपेक्षा जास्त रकमेच्या 125 हून अधिक बांधकाम प्रकल्पांना मंजुरी दिलीच कशी? असा सावल न्यायालयाने महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना केला होता.

त्यामुळे प्रदुषणाच्या बाबतीत मुंबई महापालिकेचा भोंगळ कारभार समोर आल्यामुळे पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. अशातच आता पालिकेने मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथील स्टेशनच्या बांधकामात वायू प्रदूषण नियंत्रण नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी मुंबई महापालिकेने बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ बंद करण्याची नोटीस बजावली आहे.

बीकेसी परिसरातील बांधकामामुळे धूळ आणि प्रदूषणाचे प्रमाण वाढल्याच्या तक्रारी पालिकेकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर पालिकेच्या तपासणीत नियमांचे उल्लंघन झाल्याचं आढळल्यामुळे. आवश्यक धूळ नियंत्रण उपाय, पाण्याचा फवारा, आच्छादन आणि पर्यावरणीय नियमांची अंमलबजावणी न झाल्याने ही कारवाई केल्याचं पालिकेकडू करण्यात आली आहे.

शिवाय महापालिकेने संबंधित यंत्रणेला आवश्यक त्या सुधारणा करण्याचे निर्देश दिले आहेत. तर या सुधारणा पूर्ण झाल्याशिवाय काम सुरू करता येणार नाही, असंही महापालिकेने सांगितलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT