MNS: आदल्या दिवशी भावनिक पोस्ट, दुसऱ्या दिवशी अपघाती मृत्यू; मनसे नेत्यावर काळाचा घाला

MNS Leader Harish Heda Dies in Accident: हरीश हेडा यांच्या पत्नी अलका हेडा यांनी कारंजा नगरपालिका निवडणुकीत अध्यक्षपदाची निवडणूक लढवली होती. हेडा यांच्या पत्नी पराभूत झाल्या होत्या. त्या नंतर मंगळवारी हरीश हेडा यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली होती.
MNS Leader Harish Heda Dies in Accident
MNS Leader Harish Heda Dies in AccidentSarkarnama
Published on
Updated on

नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत पत्नीने नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवली होती, अशा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्याचा मृत्यू झाला आहे. भरधाव पिक-अप वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. निवडणुकीत पराभव झाल्याने आदल्या दिवशीच त्यांनी एक भावनिक पोस्ट लिहून मतदारांचे आभार मानले होते.

मनसेचे शहर पदाधिकारी हरिश हेडा हे दुचाकीवरुन जात असताना त्यांना वाशिमच्या कारंजा वाशिम बायपास जवळ असलेल्या रिलायन्स पेट्रोल पंपजवळ एका भरधाव पिक-अप वाहनाने जोरदार धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. काल बुधवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

MNS Leader Harish Heda Dies in Accident
Uddhav Thackeray Raj Thackeray Alliance: महाराष्ट्राच्या राजकारणातील ऐतिहासिक घडामोड : ठाकरे बंधूंकडून युतीची अधिकृत घोषणा, मुंबईचा महापौरही ठरवला!

हरीश हेडा यांच्या पत्नी अलका हेडा यांनी कारंजा नगरपालिका निवडणुकीत अध्यक्षपदाची निवडणूक लढवली होती. हेडा यांच्या पत्नी पराभूत झाल्या होत्या. त्या नंतर मंगळवारी हरीश हेडा यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली होती.

MNS Leader Harish Heda Dies in Accident
Kolhapur Politics: सत्ताधाऱ्यांना धक्का देत पुण्याच्या निवृत्त पोलिस अधिकाऱ्याची पत्नी नगराध्यक्षपदी विराजमान

या पराभवाने खचून न झाला ते पुन्हा पक्षाच्या कामाला लागले होते.अपघाताच्या आदल्या दिवशी त्यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहित मतदारांचे आभार मानले होते. 'विझलो जरी मी, हा माझा अंत नाही...' असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते.

मुलीला शिकवणीला सोडून....

मुलीला शिकवणी वर्गातून घरी सोडून ते वाशिम कारंजा बाय पासवर कामानिमित्त जात होते. रस्त्यात भरधाव पिक-अप वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. पत्नीच्या पराभवानंतर हेडा यांनी 'विझलो जरी मी, हा माझा अंत नाही... पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवतं नाही'अशी भावना सोशल मीडियावर व्यक्त केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com