Shekhar Singh  Sarkarnama
प्रशासन

PCMC News : लाचखोरांना शेखरसिंहाचा मोठा दणका; यंदा सहा कर्मचारी सस्पेंड !

उत्तम कुटे

Pimpri Chinchwad : गेल्या पावणेदोन वर्षापासून पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रशासकीय कारभार सुरू असून, या कालाधीत तेथे मोठा भ्रष्टाचार बोकाळला आहे. कर्मचारी, अधिकारी बेशिस्त झाले असून, त्यांच्यावर वचक राहिलेला नाही. त्यातून 'मलईदार' स्थापत्य विभागातील ज्युनिअर इंजिनिअर संतोष दत्तात्रय शिरसाठ सस्पेंड झाला.

लाचखोरीसह फसवणुकीच्या गुन्ह्यांत महापालिकेच्या सहा कर्मचारी, अधिकाऱ्यांवर यावर्षी आतापर्यंत ही रेकॉर्डब्रेक कारवाई झाली. त्यामुळे नगरसेवकांचाच कारभार बरा होता, असे म्हणण्याची वेळ पिंपरी-चिंचवडकरांवर आली आहे.

महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखरसिंह यांनी शिरसाठला घरी बसवले. त्याची डिपार्टमेंटल चौकशीही लावली. चौकशी दोन आठवड्यांत संपवून दोषारोपपत्र दाखल करण्यास सांगितले आहे, अन्य़था ती करणाऱ्यावरच कारवाईचा इशारा दिला आहे.

बीट निरीक्षक तथा अतिक्रमण पथकाच्या प्रमुखपदाची जबाबदारी शिरसाठकडे होती. त्याने 25 मार्च रोजी भोसरी एमआयडीसीत पाच फोर्क लिफ्ट मशिनवर कारवाई केली. मात्र, त्या पालिकेत जमा केल्या नाहीत. त्याबाबत तक्रार झाल्यावर त्याने त्या पाच महिन्यांनंतर 27 ऑगस्टला जमा केल्या. त्याबद्दल गंभीर गैरवर्तणूक आणि संशयास्पद काम, असा ठपका ठेवून आय़ुक्तांनी त्याला सस्पेंड केले.

जांभळेच पुन्हा प्रभारी आयुक्त...

शिरसाठला घरी बसवून शेखरसिंह हे दीड महिन्यातच दुसऱ्यांदा परदेश दौऱ्यावर गेले आहेत. ते सिंगापूरला प्रशिक्षणाला गेलेत. ते यापूर्वी 31 ऑक्टोबरला सात दिवसांच्या जर्मनीच्या स्टडी टूरवर गेले होते. या दोन्ही टूरबाबत प्रशासनाने माहिती देण्यास टाळले होते.

तीन अतिरिक्त आयुक्तांपैकी त्यांच्या मर्जीतील प्रदीप जांभळे-पाटील हेच पुन्हा प्रभारी आयुक्त म्हणून कारभार पाहणार आहेत. मात्र, त्यांना धोरणात्मक निर्णय न घेण्याचा कोलदांडा घालण्यात आला आहे. राजकीय शिष्टाचार आणि आपत्ती व्यवस्थापनविषयक काम त्यांना करता येणार आहे.

(Edited by Sunil Dhumal)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT