Bageshwar Baba : बागेश्वरबाबांचा मराठा आरक्षणाला पाठिंबा; नेमकं काय म्हणाले...

Jagdish Mulik : पुण्यात बागेश्वर महाराज यांचा तीन दिवसांच्या कार्यक्रम
Bageshwar Baba
Bageshwar BabaSarkarnama
Published on
Updated on

चैतन्य मचाले

Pune Political News : राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीचा मुद्दा तापत असतानाच बागेश्वर धामचे पंडीत धीरेंद्रशास्त्री यांनी मराठ्यांच्या आरक्षणाला पाठींबा देत, आपली भूमिका मांडली. मराठा समाज हा वीर असून त्यांना शौर्याची परंपरा असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. धीरेंद्रशास्त्री (पंडीत बागेश्‍वर बाबा) यांच्या या भूमिकेचे मराठा समाजाकडून स्वागत करण्यात येत आहे.

मराठ्यांना आरक्षण देण्याच्या मागणीवरून आक्रमक झालेल्या मनोज जरांगे-पाटील यांनी दुसऱ्या टप्यातील राज्यव्यापी दौऱ्याला प्रारंभ केला आहे. त्यातून बहुतांशी जिल्हे, तालुक्यात सभा घेऊन जरांगे-पाटील हे वातावरण तयारी करीत आहेत. त्याचाच भाग म्हणून, जरांगे यांची पुण्यातील खराडी सोमवारी सभा झाली. तेव्हाच पुण्यात असलेल्या बागेश्‍वर बाबांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन जरांगेंच्या विशेषत: मराठा आरक्षणाला समर्थन दिले.

Bageshwar Baba
Devendra Fadnavis : अंतरवाली सराटीतील लाठीचार्जचे आदेश फडणवीसांनी दिले ? 'ही' माहिती आली समोर...

जगदीश मुळीक फाउंङेशनच्या वतीने पुण्यात बागेश्वर महाराज यांचा तीन दिवसांच्या कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी ते पुण्यात आले आहेत. माजी आमदार मुळीक यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम होत आहे. मराठा आरक्षणासह राजकीय पक्ष, नेते, त्यांच्या भूमिकांवरही बागेश्‍वर महाराजांनी भाष्य केले. पाऊण तासांच्या पत्रकार परिषदेत बागेश्‍वर महाराजांनी दिलखुलास संवाद साधला.

‘धर्म, जात व्यवस्था यावर सध्याचे राजकारण सुरू असून गेले काही महिन्यांपासून हनुमान चालीसावरून जे राजकारण केले जात आहे, त्यावर नाराजी व्यक्त केली. हनुमान चालीसा हा राजकारण करण्याचा विषय नसल्याचे त्यांनी सांगितले. भारत हिंदू राष्ट्र कसा होईल, यासाठी आपले प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संत तुकाराम महाराजांच्या दर्शनाला जाणार !

संत तुकाराम महाराज यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याने बागेश्वर बाबा काही महिन्यांपूर्वी चांगलेच चर्चेत आले होते, त्यावर आपली भूमिका स्‍पष्ट करताना बागेश्वर बाबांनी चुकीच्या माहितीमधून हा प्रकार घडल्याचे सांगत यापूर्वी दिलगीरी व्यक्त केल्याचे सांगितले.

'संत तुकारामांची परंपरा मोठी असून त्यांच्याबद्दल आपल्या मनात नेहमी आदराची भावना आहे. पुण्यात कार्यक्रमासाठी आलेलो असून वेळ मिळाल्यास संत तुकाराम महाराज यांच्या दर्शनासाठी जाणार.' असे बागेश्वर बाबांनी यावेळी जाहीर केले. शिर्डी येथील साईबाबांबद्दल घेतलेल्या भूमिकेचेही स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिले.

(Edited by Sunil Dhumal)

Bageshwar Baba
Sharad Pawar VS Ajit Pawar: राष्ट्रवादी कुणाची ? सुनावणी वेळी शरद पवारांच्या वकिलांचा आयोगात मोठा दावा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com