CAG  Sarkarnama
प्रशासन

CAG News : महसुली जमा आणि खर्चात ताळमेळ नसल्याने राज्याच्या तिजोरीवरील आर्थिक ताण वाढतोय; 'कॅग'ने व्यक्ते केली चिंता!

CAG concern over states collection and expenditure : ३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या वर्षाचा कॅगचा राज्य वित्तव्यवस्था लेखापरीक्षा अहवाल शुक्रवारी विधानसभेत मांडण्यात आला.

Mayur Ratnaparkhe

CAG and Maharashtra Goverment : राज्याच्या महसुली जमा आणि महसुली खर्चात ताळमेळ नसल्याने राज्याच्या तिजोरीवरील आर्थिक ताण वाढत असल्याबद्दल भारताचे नियंत्रक आणि महालेखापालांच्या (कॅग) अहवालात चिंता व्यक्त करण्यात आली आहे. ३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या वर्षाचा कॅगचा राज्य वित्तव्यवस्था लेखापरीक्षा अहवाल शुक्रवारी विधानसभेत मांडण्यात आला, त्यात ही चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

राज्याची महसुली जमा आणि महसुली खर्च यांच्यातील तफावत सातत्याने वाढत आहे. त्यामुळे राजकोषीय ताण वाढत असल्याचे संकेत मिळत आहेत. राज्याचा स्वतःचा कर महसूल, करेतर महसूल, राज्याच्या हिश्श्याचे केंद्राकडून होणारे करातील हस्तांतरण, केंद्र सरकारकडून मिळणारी अनुदाने व काढलेले कर्ज असे उत्पन्नाचे वेगवेगळे स्त्रोत असून महसूली तुट लक्षात घेता उत्पन्नाचे स्त्रोत वाढवण्याची शिफारस कॅगने अहवालात केली आहे.

२०१८-१९ ते २०२२-२३ या कालावधीत महसुली जमा २,७८,९९६ कोटींवरून ११.३१ टक्के सरासरी वाढीच्या दराने ४,०५,६७७ कोटींवर पोहचली. तर राज्याच्या खर्चाचे विवरण विआचारात घेता २०१८-१९ ते २०२२-२३ या काळात महसुली खर्च २,६७,०२१ कोटी रुपयांवरून ४,०७,६१४ कोटी रुपयांवर पोहचला आहे. महसुली जमा आणि महसुली खर्च यातील तफावतीमुळे १,९३६ कोटी रुपयांची महसुली तूट निर्माण झाल्याचे कॅगने अहवालात म्हटले आहे.

भांडवली लेख्यापोटी शासनाने केवळ ६१,६४३ कोटी रुपये खर्च केले आहेत. २०२२-२३ वर्षात हा खर्च एकूण खर्चाच्या १३ टक्के होता. भांडवली खर्च एकूण कर्जाच्या ७० टक्के होता. अशा प्रकारे कर्जाऊ निधीचा मोठा हिस्सा हा भांडवली विकास कामांसाठी वापरता जात होता, असे निरीक्षण कॅगने अहवालात नोंदवले आहे.

राज्याचे थकित कर्ज २०१८-१९ मध्ये ४,३६,७८१,९४ कोटी रुपयांवरून २०२२-२३ अखेरीस ६,६०,७५३.७३ कोटी रुपयांपर्यंत वाढले. राज्य सरकारने २०२२-२३ मध्ये १४,२०० कोटी रुपयांच्या कर्जाला हमी दिली आहे. त्यामुळे सरकारवरील दायित्व वाढत असल्याचे कॅगने म्हटले आहे.

विभागांच्या गरजा आणि वाटप केलेल्या संसाधनांचा वापर करण्याची त्यांची क्षमता लक्षात घेऊन राज्य सरकारने विश्वासार्ह गृहितकांवर आधारित वास्तववादी अर्थसंकल्प तयार केला पाहिजे, यावर कॅगच्या अहवालात विशेष टिप्पणी करण्यात आली आहे. दिला आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT